लाँकडाऊन मुळे गटई कामगारावर उपासमारीची वेळ.

उल्हासनगर : कोरोना व्हायरसचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी सरकारने घोषीत केलेल्या लाँकडाऊन मुळे येथील गटई कामगारांचा व्यवसाय पुर्णपणे ठप्प झाला असल्याने त्याच्या कुटुबियांवर उपासमारीची वेळ आली आहे.सरकारने गटई कामगारांना त्वरित मुख्यमंत्री आपतकालीन सहायता निधीतून आर्थिक मदत देण्याची मागणी गटई कामगार नेते रामसिंग सीरस यांनी मुख्यमंत्र्यांना एका निवेदनाद्वारे केली आहे.

देशासह महाराष्ट्र राज्यात कोरोना व्हायरसने कहर माजविला असुन त्यात शेकडो नागरिकांना आपला प्राण गमवावा लागला आहे.जलद गतीने कोरोना वायरसचा वाढता प्रार्दुभाव रोखण्यासाठी  सरकारने संर्पूण देशात ३  मे पर्यंत लाँकडाऊन चा कालावधी वाढविला आहे.

लाँकडाऊन मुळे उल्हासनगर मधील शेकडो गटई कामगारांना आपली दुकाने बंद ठेवावी लागत आहे.पंरतु रोज कमाई करुन कुटुंब चालविणा-या गटई कामगांराच्या परिवारावर उपासमारीची  वेळ आली आहे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी गटई कामगांराच्या परिवाराला मुख्यमंत्री आपतकालीन सहाय्यता निधीतुन त्वरीत दहा हजार रुपयांची आर्थिक मदत देण्याची मागणी गटई कामगार नेते रामसिंग सिरस यांनी एका निवेदनाद्वारे केली आहे.

संबंधित पोस्ट