संचारबंदीचे उल्लघंन करणा-या वधुवरासह व-हाडीना हिल लाईन पोलिसांनी केली अटक.



उल्हासनगर: कोरोना व्हायरसचा  कहर थांबविण्यासाठी सरकारने ३  मे पर्यंत लाँकडाऊन घोषीत केले असून संपुर्ण  देशासह महाराष्ट्र राज्यातही संचारबंदी लागु करण्यात आली आहे. संचारबंदीचे सर्रासपणे उल्लघंन करुन लग्न संमारभाला हजेरी लावणा-या  व-हाडी मंडळीसह वधुवरास हिललाईन पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

कोरोना व्हायरसने पूर्ण जगात थैमान  माजविलेआहे.यात हजारो नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.संपुर्ण  देशासह महाराष्ट्र राज्यातही तिच स्थीती आहे.कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारने ३  मे पर्यंत लाँकडाऊन घोषीत केला आहे.या पार्श्वभूमीवर संचारबंदी लागु केलेली असतांना संचारबंदीचे सर्रास पणे उल्लघंन करत उल्हासनगर कँम्प.न.५  येथील दशहरा मैदानात लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या पुतळ्यासमोर लग्न समारंभाला आलेल्या व-हाडी मंगळीसह वधुवर व त्यांच्या आईवडिलांना हीललाईन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय सावंत यांच्या पोलिस पथकाने ताब्यात घेतले आहे.ही घटना काल  दुपारी उल्हासनगर न.पाच हिललाईन पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे.

संबंधित पोस्ट