पत्रकार नंदकुमार चव्हाण यांना बंधुशोक,

विद्यार्थ्यांना घडवणारा शिक्षक काळाच्या पडद्याआड.

उल्हासनगर / प्रतिनिधी :  : मुंबई महानगरपालिकेतील शिक्षक पदाची स्वेच्छा निवृत्ती घेऊन कोचिंग क्लासेसच्या माध्यमातून असंख्य विद्यार्थ्यांना मार्गी लावून त्याचे जीवन घडवणारा शिक्षक अकस्मातपणे काळाच्या पडद्याआड झाला आहे.या शिक्षकाचे नाव विनोद दत्तात्रय चव्हाण असून ते पत्रकार नंदकुमार चव्हाण यांचे मोठे बंधू होते.नंदकुमार यांना पायावर उभे करण्यास वडीलबंधु म्हणून विनोद चव्हाण यांचे मोठे योगदान आहे.


उल्हासनगर येथिल मराठा सेक्शन मध्ये राहणारे विनोद चव्हाण व त्यांची पत्नी वैभवी चव्हाण हे दाम्पत्य सुयश कोचिंग क्लासेस चालवत होते.या क्लासमधील अनेक विद्यार्थी टॉपर आलेले आहेत.विद्यार्थ्यांसाठी सुयश क्लासेस फेव्हरेट आहे.विनोद चव्हाण हे विद्यार्थ्यांना घडवत असताना त्यांना अनेक अडचणीत सांभाळत होते.पण दोन दिवसांपूर्वी विनोद चव्हाण यांना अनपेक्षितपणे डोक्यात वेदना होऊ लागल्या.त्यांना उल्हासनगरातील खाजगी रुग्णालयात ऍडमिट करण्यात आले.तिथे अखेर काल  त्यांची प्राणज्योत मावळली. आणि चव्हाण परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला.अवघ्या पन्नाशीत विनोद चव्हाण यांचे निधन झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.


विनोद चव्हाण यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगा मुलगी,भाऊ असा परिवार आहे. चव्हाण यांचे निधन झाल्याची माहिती समजताच कोकणातील मालवण मधील नातलगांनी नेहमीच सुखादुःखात धावणारे,जीव लावणारे विनोद चव्हाण यांच्या अंतिम यात्रेत येण्याची तयारी केली केली.त्यांनी तसा फोन नंदकुमार चव्हाण यांना केला.नको तिथूनच श्रद्धांजली अर्पित करा.लॉकडाऊन संपल्यावर या असे सांगताना नंदकुमार चे अश्रू अनावर झाले होते.

संबंधित पोस्ट