नशामुक्ती केंद्रातील लोक कोरोनाचे शिकार होऊ नये जनहित याचिका दाखल

  मुंबई : मुंबई आणि राज्यात अनेक नशा मुक्ती केंद्र आहेत.या नशा मुक्ती केंद्रात सुमारे तीन हजार पेक्षा जास्त लोक आहेत. एका एका नशा मुक्ती केंद्रा मध्ये दोनशे ते तीनशे व्यक्ती दाखल आहेत. त्यांना नशा मुक्त करण्यासाठी , आणि त्यांच पुनर्वसन करण्यासाठी सामाजिक संस्था काम करत असतात. मात्र, सध्या कोरोना  व्हायरस चा  वाढता प्रभाव आहे. कोरोना  व्हायरस  सतत वाढत असून   घातक असा हा व्हायरस  असल्याने याचा धसका सर्वांनी घेतला आहे.मात्र,यावेळी व्यसन जडलेल्या व्यक्ती एकाच ठिकाणी मोठया संख्येने राहत असल्याने त्यांच्या जीवाला ही धोका निर्माण झाला आहे.यामुळे या व्यक्तीं नशामुक्ती केंद्रातून काही काळासाठी सोडावं,या मागणीसाठी मुंबई हायकोर्टात एक जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे.ही याचिका प्रिया कुलकर्णी यांनी दाखल केली  असून , त्यांच्या वतीने ऍड नितीन सातपुते हे युक्तिवाद करणार आहेत.

संबंधित पोस्ट