कोरोना’असल्याच्या संशयावरुन शेजाऱ्यांनी मदत नाकारल्याने आई मुलीलाच वडिलांच्या मृत्यूदेहाला द्यावा लागला खांदा !

चेंबूर : ( जीवन तांबे )मुंबईत लॉक डॉउन असल्याने तसेच सोशल डिस्टन्सिंग पाळण्याचे आव्हान नागरिकांना पालिका दिले असताना चेंबूर येथील साईबाबा मंदिरा जवळ राहणाऱ्या वृद्धाला हृदय विकाराचा झटकाने मृत्यू झाला असता मृत्यू देह स्मशानात घेऊन जाण्यास कोणी मदत केली नसल्याने  शेवटी आई, मुलींने खांदा देऊन अत्यंसंस्कार केले. चेंबूर येथील चेंबूर कॅम्प  परिसरातील साईबाबा मंदिर जवळ राहणारे  समीर रविंद्र नासकर  वय ६१ यांना

दि,१० एप्रिल रोजी संध्याकाळी हृदयविकाराचा धक्का आला असता ते घरात एकटेच पडून होते. त्याची पत्नी ही मुलगी कडे जेवण आणयला गेली होती. घरी येताच त्यांना पती ला छातीत दुखत असल्याने ते खाली पडले असल्याचे दिसले. तीने आपल्या मुलीला बोलावून घेतले आणि वडिलांना सायन रुग्णालयात घेऊन जाण्याकरिता शेजाऱ्याकडे मदत मागितली.   शेजाऱ्यांकडे घर ठोकवून  आपल्या पतीला मदत करण्याची विनंती केली. परन्तु 

समीर नासकर हे कोरोना बाधित असल्याचा  संशयावरून शेजारी मदत करण्यास आले  नाही. त्यामुळे रुग्णवाहिका येण्यास उशीर झाला. वेळेत उपचार न मिळाल्याने त्याचा काल सायन येथील पालिका टिळक रुग्णालयात मृत्यू झाला. 

 समीर नासकर यांचा मृतदेह पुन्हा घरी आणण्यात आला. तेव्हा त्यांचा कोरोनांने मृत्यू झाल्याच्या संशय घेऊन कोणीही मदत केली नाही.

लॉकडाऊन असल्यामुळे नातेवाईक मायलेकीला मदत करायला येऊ शकले नाहीत. शेवटी रेतीवाला शौकत भाई व समाजसेवक राजभाई यांनी माणुसकीच्या नात्याने मदत केली. व पित्याच्या मृतदेहाला आई नासकर आणि मुलगी मोनिका नासकर यांनीच जवळ आसलेल्या चरई स्मशान भूमी  पर्यंत खांदा देऊन अग्निसंस्कार केले

रिपोर्टर

  • Adarsh Maharashtra
    Adarsh Maharashtra

    Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.

    आदर्श महाराष्ट्र वेब टीम

संबंधित पोस्ट