उपसरपंच सौ. मनिषा भगवान पाटील यांचा उपक्रम!
ढाक येथील आदिवासींना वाटले जीवनावश्यक वस्तु!
- by Adarsh Maharashtra
- Apr 12, 2020
- 814 views
कर्जत(धर्मानंद गायकवाड):- रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यांतील वदप ग्रामपंचायतीचा उपसरपंच सौ. मनिषा भगवान पाटील यांनी वदप ग्रामपंचायत हद्दीतील ढाक येथिल डोंगरावरील आदिवासी बांधवांना जीवनावश्यक वस्तुंचे वाटप केले आहे. त्यामुळे येथिल आदिवासी बांधवांना दिलासा मिळाला आहे. वदप ग्रामपंचायतीचा उपसरंपच सौ. मनिषा पाटील यांनी हा स्तुत्य उपक्रम राबविल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
सध्या देशात कोरोना व्हायरसने पंचड थैमान घातले आहे. या पार्श्वभुमीवर शासकीय यंत्रणा प्रंचड कामाला लागली आहे. विविघ सामाजिक संस्था, लोकप्रतिनिधी तसेच स्थानिक स्वराज्य संस्था गोरगरीबांना मदत करण्यासाठी पुढे सरसावल्याचे दिसुन येत आहे. असे असतानाच ढाक डोंगर परीसर प्रंचड दुर्बल आहे. या भागांत आदिवासी बांधवांचे वास्तव्य अधिक आहे. येथिल आदिवासी बांधव लाकडाचा मोळ्या तसेच रोजंदारीवर काम करीत असतात. मात्र सध्या देशात लाॅकडाऊन असल्याने येथिल काही आदिवासी बांधवांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे येथिल वदप ग्रामपंचायतीने यामघे पुढाकार घेवुन वदप ग्रामपंचायतीचा उपसरपंच यांनी येथिल या झाक डोंगरांवर जावुन येथिल आदिवासी बांधवांचा जीवनावश्यक वस्तुंचे वाटप केले आहे. त्यामधे कांदा,बटाटे, साखर, चहापावडर, बिस्कीटचे पुडे व अन्य जीवनावश्यक वस्तूंचा समावेश आहे.
दरम्यान वदप ग्रामपंचायतीचा उपसरंपच सौ. मनिषा भगवान पाटील यांचा संकल्पनेतुन हा या सामाजिक उपक्रम राबवण्यात आला असल्याने सौ. पाटील यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. यावेळी ३५ आदिवासी कुटुंबांनी याचा लाभ घतला आहे. सोशल डिस्टन्सचे पालन करुन हा उपक्रम राबवण्यात आला आहे. यावेळी येथिल प्रतिक्षा पाटील, प्रविण पाटील, भगवान पाटील, संदिप पाटील हे येथे उपस्थिती होते.
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम