लोकशाहीचा चौथा स्तंभ आर्थिक संकटात ! देशासह जगातील आपत्कालीन परिस्थितीचा अचूक वेध घणार्या पत्रकारांची कैफियत कोण समजून घेणार ?

 बोरघर  / माणगांव :कोरोना मुक्ती साठी शासनाने संपूर्ण देशात लावलेल्या लाॅकडाऊन कालावधीत  गोरगरीब, रोजंदारी मजुरांसाठी प्रशासन आणि सामाजिक संस्था एकवटल्यात. कोणीही उपाशी राहता कामा नये याची दक्षता लोकप्रतिनिधींही घेतांना दिसून येत आहेत. परंतू ग्रामीण आणि शहरी पत्रकारांच काय? मिळणाऱ्या जाहिरातीवरच्या कमिशनवर पत्रकारिता करणाऱ्या पत्रकारांचा कुणी विचार करणार आहे का ?.

ग्रामीण भागापासून ते शहरी भागात प्रिंट आणि इलेकट्रोनिक प्रसार माध्यमात काम करणाऱ्या पत्रकारांचीही हीच अवस्था आहे. अनेक माध्यमात गेल्या तीन महिन्यापासून पगार नाही. लॉकडाउन काळात जीव धोक्यात टाकून बातम्यांसाठी वणवण भटकणाऱ्या पत्रकारांना या काळात जगण्याचं काय साधन आहे. 

      शासनाने कोरोना मुक्तीसाठी कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर केलेल्या लाॅकडाऊन कालावधीत समाजातील दीन दुबळ्यांना किराणा, अन्न वाटप करण्यासाठी पत्रकारांचा गराडा घेऊन जाणारे लोकप्रतिनिधी, दानशूर व्यक्ती, सामाजिक, धार्मिक संस्था सुद्धा यावेळी पत्रकारांकडून काम काढून घेण्यात धन्यता मानतात. 

      मात्र त्याला लॉकडाउन काळात आर्थिक टंचाई भासत असेल याची साधी विचारपुसही करत नाही. आपला जीव धोक्यात घालून कंपनीला इंपुट्स देतांना मोठी जबाबदारी पार पाडण्याची भूमिका पत्रकारांची असते. त्यातही एक चूक पत्रकारांची नोकरीही जाण्यापर्यंत येते. वरिष्ठांची चूक बेदखल असते. तळागळात काम करणाऱ्या पत्रकारांची एक चूक नोकरी गमावनारी असते. त्यात पोलिस प्रशासनाला अंगावर घेऊन पत्रकार काम करत असतात.

अनेकदा पत्रकारांना पोलिसांच्या लाठ्याना सामोरे जावे लागत. पण याची दखल ना कुणी लोकप्रतिनिधी घेत ना काम करणारी कंपनी. सध्याच्या काळात पत्रकारांची अवस्था अत्यंत वाईट आहे. खिशात पैसे नाहीत, घरात तेल, कांदा, बटाटा, गहू , तांदूळ, मीठ, मसाला नाही, आणि बातमीसाठी कंपनीचा तगादा कायम आहे. जनसामान्यांचे प्रश्न तडीस नेणारा पत्रकार सध्या अडचणीत आहे. चांगलं काम करणाऱ्या पोलीस आणि आरोग्य प्रशासनासाठी सगळ्यांनी थाळी आणि टाळी वाजवली पण त्यांनी वाजवलेली टाळी जनसामान्य पर्यंत पोहचवनार्या पत्रकारांवर उपासमारीची वेळ आली आहे. 

     तरी देखील लोकशाहीचा हा चौथा स्तंभ अर्थात पत्रकार निस्वार्थ भावनेने आणि ताठ मानेने कोरोना व्हायरसच्या राष्ट्रीय

आपत्कालीन संकटात सुद्धा आपल्या जीवाची पर्वा न करता कोरोनाला न घाबरता सरकारी व लाॅकडाऊनच्या नियमांचे पालन करून आपल्या पत्रकारिता पेशा पासून तीळभर मागे न सरकता मोठ्या जिद्दीने, चिकाटीने आणि धैर्याने लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाची जबाबदारी सांभाळून राष्ट्रावर आलेल्या कोरोनाच्या संकटा विरूद्धच्या लढाईत आमचे पत्रकार योद्धे हातात पेनाची तलवार घेऊन निकराने लढत आहेत. या सर्व पत्रकारांची शासन, प्रशासन, आमदार खासदार आणि लोकप्रतिनिधी आतातरी  दखल घेतील का  ? पत्रकारांची कैफियत कोण समजून घेणार ? असे म्हणण्याची वेळ सद्या पत्रकारांवर आली आहे.

संबंधित पोस्ट