कोरोनामुळे सरकारने मुंबई लॉकडॉउन केल्याने चेंबूर येथील लाल डोंगर येथील आंबेडकरी चळवळीतील गायकावर उपासमारीची वेळ
- by Adarsh Maharashtra
- Apr 10, 2020
- 593 views
मुंबई :(जीवन तांबे)डॉ.बाबासाहेब आबेडकर यांच्या नंतर खऱ्या अर्थाने बुद्ध, फुले, कबीर, शाहू यांचे विचार गाण्यातून घराघरात रुजविण्याचे काम गायकांनी केले आहे. मात्र कोरोनामुळे सरकारने मुंबई लॉकडॉउन केल्याने चेंबूर येथील लाल डोंगर येथील आंबेडकरी चळवळीतील गायकावर उपासमारीची वेळ आली आहे.
सायन पनवेल मार्गावर असलेली लाल डोंगर झोपडपट्टी आंबेडकरी चळवळीचा बालेकिल्ला ओळखला जातो. या परिसरातून आत्तापर्यंत अनेक आंदोलने उभी राहिली आहेत.
याच परिरातील पंचशील नगर मध्ये रहाणारे आंबेडकरी चळवळीतील गायक अनंत सुदाम वाळके यांनी सत्तरी पार केली आहे.
त्यांनी दारूबंदी व हुंडाबळी विषयावर जनजागृती करीत संपूर्ण महाराष्ट्रात पिंजून काढला आहे. काही वर्षांपूर्वी त्याच्यावर किडनी आणि हृदय शस्त्रक्रिया झाल्याने प्रकृती साथ देत नसल्याने प्रबोधन करण्याकरिता कुठेही जाता येत नाही. गोळ्या व औषधा करीता पैसे राहिले मिळत नाही. घरकाम करून कसेतरी घर चालविणारी वयोवृद्ध पत्नी भागेत्रा वाळके यांच्यावर कोरोनामुळे घरात राहून उपाशी मरण्याची वेळ आली आहे. या दोघासमोर उदरनिर्वाहाचा मोठा प्रश्न उभा राहिला आहे.
गेल्या काही वर्षांपूर्वी चळवळीत काम काम करीत आसताना अनेक कार्यकर्त्यांनी त्यांना मदत केली आहे. कोरोनाने देशभर अंथरून परविल्याने कोणताही कार्यकर्ता त्याना भेटत नाही किव्हा कोणीही घरी येत नाही. त्यामुळे पैशाची मोठी समस्या त्याच्यासमोर निर्माण झाली आहे
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम