चेंबूर येथील गांधी मैदानात मिळणार सकाळी ठीक .9 ते दुपारी ठीक. 1 च्या दरम्यान भाजीपाला! दुपारी 1 नंतर कोणीही विक्रेता सापडल्यास कारवाई
- by Adarsh Maharashtra
- Apr 10, 2020
- 1082 views
मुंबई : ( जीवन तांबे )चेंबूर येथील पालिका एम. पश्चिम विभागात कोरोना बाधित रुग्णांचा आकडा 24 वर गेल्याने पालिकेची यंत्रणा मोठ्या प्रमाणात कामाला लागली आहे.
या परिसरातील नागरिक भाजीपाला खरेदी करण्याच्या नावाखाली दरदिवशी घराबाहेर पडत आसल्याने पालिकेने निर्णय घेऊन फक्त चेंबूर येथील गांधी मैदानात सकाळी ठीक.9 ते दुपारी ठीक.1 वाजण्याच्या सुमारास भाजी विक्रेत्यांना बसायची परवानगी दिली आहे.
चेंबूर येथील पी. एल. लोखंडे मार्गावर असलेल्या महात्मा फुले नगर, मुकुंद नगर झोपडपट्टीत एकूण 8 रुग्ण तर आज चेंबूर रेल्वे स्थानक जवळील सिध्दार्थ रिसिंडन्सी इमारत मध्ये एकूण 1 रुग्ण कोरोना बाधित आढळले आहेत. त्यामुळे पालिकेसमोर मोठे आव्हान उभे राहिले असतानाच मात्र
चेंबूर कॅम्प, राम टेकडी, लाल डोंगर, सिद्धार्थ कॉलनी, आनंद नगर, खारदेवनगर, घाटले गाव, सुभाषनगर, शेल कॉलनी, टिळकनगर परिसरातील नागरिक बिनधास्त भाजी खरेदी करण्याच्या नावाखाली फिरण्याकरिता रस्त्यावर येत आहेत.
बहुतेक भाजी विक्रेते पैसे कमविण्याचा हाच मोका असल्याने बिनधास्त तोंडाला मास्क, हँडग्लोज न वापरता पालिकेचे नियम धाब्यावर बसवून धंदा करताना दिसत आहेत. त्यांच्या अशा स्वार्थी वृत्ती व होणाऱ्या गर्दीमुळे सामूहिक संसर्गाचा धोका निर्माण होऊ शकतो. पुढील येणारे संकट लक्षात घेऊन सहाय्यक आयुक्त पृथ्वीराज चौहान यांनी बुधवारी प्रभागातील सर्वच ठिकाणी भाजीपाला विक्रीस मनाई करण्याचा आदेश दिला होता. भाजीविक्रेत्याना बसण्यास बंदी केल्याने भाजी नागरिकांना मिळणार नाही. त्याकरिता एका ठिकाणी तरी भाजीपाला सुरू करावा अशी नागरिकांनी केली असता शेवटी चेंबूर येथील गांधी मैदानात एकूण 42 भाजी विक्रेत्यांना जागा आखून देण्यात आली आहे. त्यांना मास्क, हॅण्ड ग्लॉज घालणे बंधनकारक करण्यात आले असून सुरक्षतेच्या उपाययोजना करण्याच्या अटी घालण्यात आल्या आहेत. सकाळी ठीक.9 ते दुपारी ठीक.1 वाजेपर्यंत बसण्याची परवानगी दिली आहे. दुपारी ठीक.1वा.नंतर एकही भाजीविक्रेता, फळ विक्रेता, अंडी विक्रेता आढळल्यास कडक कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.
दरम्यान पालिकेने घातलेल्या एकाही नियमांचे उल्लंघन केल्यास वा या ठिकाणी गर्दी आढळल्यास अनिश्चित काळासाठी या ठिकाणी भाजी विक्रीस मनाई करण्यास येणार असल्याचे समजते
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम