बदलापुरात पोलिसांचा रूट मार्च

बदलापूर / प्रतिनिधी : करोनाचा प्रादुर्भाव टाळण्याबाबत जनजागृती करण्यासाठी बदलापुर पूर्व भागात गुरुवारी (ता.९) पोलिसांनी रूट मार्च केला. बदलापुर पूर्व पोलीस स्टेशन पासून सुरू झालेल्या रूट मार्चचा कात्रपच्या घोरपडे चौकात समारोप करण्यात आला.

दुपारी १२.३० वा. बदलापूर पूर्व पोलीस स्टेशनपासून सुरू झालेल्या या रूट मार्चचा शिवाजी चौक-गांधी चौक- आगर आळी-स्टेशन पाडा- रेल्वे स्टेशन परिसर असे मार्गक्रमण करून दुपारी १.३० च्या सुमारास घोरपडे चौकात समारोप करण्यात आला. सहाय्यक पोलीस आयुक्त विनायक नरळे, बदलापूर पूर्व पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक दीपक देशमुख, ३ अधिकारी, २७ पोलीस कर्मचारी, ८ महिला पोलीस कर्मचारी, सहाय्यक पोलीस आयुक्त कार्यलयातील १० कर्मचारी, एसआरपीएफचे १ अधिकारी व १८ कर्मचारी या रूट मार्चमध्ये सहभागी झाले होते. सदर रुटमार्च दरम्यान मेगा फोनद्वारे जनजागृती करण्यात आली.तसेच परिसरातील भाजी विक्रेते व ज्या नागरिकांकडे मास्क नव्हते त्यांना मास्कचे वाटप करण्यात आले.

संबंधित पोस्ट