गोवंडी पोलीस ठाण्यातील खाकी वर्दीतली माणुसकी ; मुख्यमंत्री सहाय्यता निधीला दिली २५ हजाराची मदत!

मुंबई :( जीवन तांबे ) कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे देशावर संकट कोसळले असून अनेकांकडून मदतीचा हात पुढे करण्यात येत आहे. पोलीस बांधव देखील आपल्या जीवाची पर्वा न करता २४ तास आपले कर्तव्य पार पाडत आहेत. सध्या संचारबंदी असल्याने पोलीस बांधवांवरील ताण वाढला आहे. कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी प्रसंगी ते बळाचा वापर करत आहेत त्यामुळे काही टवाळ टाळक्यांसाठी सध्या ते व्हिलन ठरत आहेत. कायदा राखत असताना कडक असलेला पोलीस हा देखील शेवटी एक माणूस आहे. अश्याच एका खाकी वर्दीतल्या पोलीसाची माणुसकी चेंबूरमध्ये पाहायला मिळाली. 

     गोवंडी पोलीस ठाण्यात मिल स्पेशल म्हणून कार्यरत असलेले पोलीस कर्मचारी राजेंद्र शंकर घोरपडे यांना चेंबूर, गोवंडी भागातील बहुतांशी लोक ओळखतात. कला, क्रीडा संबंधित कार्यात त्यांचा मोठा सहभाग असतो. प्रसंगी कोणताही असो सदैव मदत करायला राजेंद्र घोरपडे नेहमीच पुढे असतात. जेव्हापासून संचारबंदी चालू झाली तेंव्हापासून राजेंद्र घोरपडे आपली ड्युटी संपल्यानंतर चेंबूर - गोवंडी भागात तैनात पोलीस बांधवांना कधी मास्क तर कधी जेवण, नास्ता, पाणी वाटताना दिसत आहेत. पक्षांना दाणे तर नाका बांधकाम कामगार, भिकारी यांना जेवण देण्याचे काम आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने राजेंद्र घोरपडे करत आहेत. खाकी वर्दीच्या मार्फत ते देशसेवा बजावत आहेत पण त्यावरही न थांबता एक नागरिक म्हणून ते आपली महत्त्वपूर्ण जबाबदारी देखील पार पाडत आहेत. त्यांनी आपल्या पगारातून २५ हजाराची रक्कम मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत केली. त्यांची आई सुलोचना शंकर घोरपडे यांच्या हस्ते गुरुवारी २५ हजाराचा धनादेश मुख्यमंत्री सहाय्यता निधीकडे जमा करण्यात आला. याप्रसंगी त्यांनी काही गरजवंतांना धान्य वाटप केले. 

  राजेंद्र घोरपडे यांच्यासारख्य खाकी वर्दीतल्या माणसाच्या माणुसकीचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे

रिपोर्टर

  • Adarsh Maharashtra
    Adarsh Maharashtra

    Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.

    आदर्श महाराष्ट्र वेब टीम

संबंधित पोस्ट