शासनाच्या राष्ट्रहिताच्या सूचनांकडे फिरवूनी पाठ ! देशातील कोरोनामुक्ती लढ्याच्या लाॅकडाऊनमुळे कुचंबणा झालेल्या चाकरमन्यांची पाऊले चालती अहोरात्र गावाकडची वाट ! !
- by Adarsh Maharashtra
- Apr 04, 2020
- 1185 views
चौकट कोरोना विषाणूची संक्रमण साखळी तोडून त्याचा संसर्ग रोखून कोरोना विषाणूला संपूर्ण भारतातून हद्दपार करण्यासाठी व कोरोना मुक्त भारत करण्यासाठी शासनाच्या माध्यमातून कोट्यवधी रुपये खर्च करून नागरी आरोग्य अबाधित ठेवण्यासाठी शासनाने सर्वोतोपरी पाऊले उचलली आहेत. कोरोना विषाणू विरोधातील या लढ्यात आपण लवकरच विजय प्राप्त करणार यात शंका नाही. मात्र ही लढाई यशस्वी करण्यासाठी लोकांचे सहकार्य शासनाला अपेक्षित आहे. म्हणून कोरोना विषाणूच्या राष्ट्रीय आपत्ती काळात लोकांनी अशा गंभीर परिस्थितीत कोणत्याही प्रकारे स्थलांतर करू नये. सद्य स्थितीत आहे त्याच ठिकाणी घरात राहणे हीच आपली राष्ट्रभक्ती, हेच आपले राष्ट्रप्रेम आहे. त्यामुळे सरकारला सहकार्य करा. शासनाने दिलेल्या सूचना काटेकोरपणे पाळा आणि कोरोना टाळा. ! चौकट पूर्ण
बोरघर / माणगांव:संपूर्ण जगभरातील देशात आणि भारतात महामारीचे तांडव माजवून सर्वत्र हाहाकार माजवणार्या कोरोना व्हायरस या संसर्गजन्य महाभयंकर रोगाच्या पार्श्वभूमीवर सदर कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी भारत सरकारने संपूर्ण देशात १४ एप्रिल पर्यंत २१ दिवसांचा लाॅकडाऊन घोषित केले आहे. त्यामुळे संपूर्ण देशात सर्वत्र संचारबंदी लागू केली आहे.
देशातील कोरोनामुक्ती साठी संपूर्ण लाॅकडाऊन संचारबंदीच्या काळात पूर्ण देशातील सर्व नागरिकांच्या संचार स्वातंत्र्यावर कोरोना विषाणूची संक्रमण साखळी तोडण्यासाठी शासनाने कायदेशीर जमावबंदीच्या माध्यमातून कडक निर्बंध लावले आहेत. त्यामुळे कामधंदा, नोकरी, रोजीरोटी मिळवण्यासाठी आपल्या घरापासून, गावापासून, तालुक्यापासून, जिल्ह्यापासून आणि राज्यापासून व देशापासून दूर असलेल्या लोकांना कोरोना व्हायरसची संक्रमण साखळी आणि त्याचा संसर्ग होऊ नये म्हणून सुरक्षेच्या दृष्टीकोनातून जिथे आहेत तिथेच त्या त्या ठिकाणी त्यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था शासनाने त्याच ठिकाणी करून त्यांना स्थानबद्ध करण्यात आले आहे. या साठी भारत सरकार आणि महाराष्ट्र शासन त्यांच्या आरोग्याची सर्वोतोपरी काळजी घेत आहे. मात्र मुंबई, ठाणे, पुणे, सुरत, गुजरात, अहमदाबाद, दिल्ली इत्यादी ठिकाणी नोकरी धंद्या निमित्त आपापल्या गावापासून कैक शेकडो किलोमीटर दूर अंतरावर त्या त्या ठिकाणच्या घनदाट लोकवस्तीच्या झोपडपट्टीत भाड्याच्या दहा बाय दहाच्या छोट्याशा झोपड्यात दहा बारा लोकांच्या समुहाने राहून अत्यंत कठीण परिस्थितीत जीवन जगणाऱ्या चाकरमन्यांची सदर लाॅकडाऊन संचारबंदीच्या काळात दिवसरात्र राहून त्या दहा बाय दहाच्या त्या झोपड्यात त्यांची प्रचंड मोठी कुचंबणा होत आहे.
एरवी दिवसभर आपापल्या कामाधंद्याच्या ठिकाणी कामावर राहून रात्री केवळ झोपण्यासाठी आपापल्या रूमवर तथा झोपड्यात येणाऱ्या त्या सर्व चाकरमन्यांना लाॅकडाऊन मुळे आता चोवीस तास त्या अत्यंत छोट्या दहा बाय दहाच्या खोलीत बसून राहणे म्हणजे प्रचंड मोठी सजा वाटू लागली आहे. छोट्याशा खोलीतील तो असह्य उकाडा त्यांना कोरोना पेक्षा जीवघेणा वाटू लागला आहे. या बंदीस्त जीवनाला कंटाळून, आणि प्रचंड लोकवस्तीच्या शहरांतील कोरोनाच्या दहशतीमुळे आणि आपण आपल्या गावाकडे गेलो तर आपल्याला काहिही होणार नाही. अशा भ्रमात राहून काही लोक कित्येक शेकडो किलोमीटर अंतरावर असलेल्या अंतराची पर्वा न करता आपापल्या गावाकडे पायीच चालत सरकारी कायदेशीर जमावबंदीचे उल्लंघन करून रात्री बेरात्री मोठ्या समुहाने शहर सोडून आपापल्या गावची वाट धरताना दिसत आहेत. लोकांच्या या वर्तनामुळे कोरोना विषाणूची संक्रमण साखळी आपापल्या तोडता येणार नाही. उलट अशा वर्तनामुळे त्यांच्या स्वतःच्या आरोग्या बरोबर सर्व भारतीयांचे आरोग्य धोक्यात येवू शकते. त्यामुळे कृपया कोणत्याही परिस्थितीत आपले घर सोडू नका. शासनाने वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे काटेकोर पणे पालन करा.
देशावर आलेल्या या राष्ट्रीय आपत्तीचा धैर्याने, निकराने व सर्वार्थाने सामना करण्यासाठी आपल्या वैयक्तिक, सामाजिक, धार्मिक आणि नैतिक मानवतावादी जबाबदारीची जाणीव ठेवून सरकारला या आपत्तीच्या काळात आपण सर्वांनी सर्वोतोपरी मदत केली पाहिजे तरच कोरोना मुक्तीची ही लढाई जिंकू शकतो.
म्हणून कोणत्याही परिस्थितीत अत्यावश्यक कामाशिवाय घरातून बाहेर पडू नये. किंवा कोणीही कुठेही कोणत्याही प्रकारे स्थलांतर करू नये. शासनाच्या माध्यमातून कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर ज्या ज्या सूचना देण्यात आल्या आहेत त्यांचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे. असे केले तरच आपण कोरोना व्हायरसच्या विरोधातील ही लढाई जिंकून कोरोना व्हायरसचे आपल्या देशातून समूळ उच्चाटन करू शकतो अन्यथा नाही. संपूर्ण लाॅकडाऊन संचारबंदीच्या काळात तुमचे घरात राहणे हेच सद्य परिस्थितीमध्ये तुमचे राष्ट्रप्रेम व राष्ट्र निष्ठा आहे. म्हणून कोरोना मुक्तीच्या या लढ्यात आपण सर्वांनी शासनाला सहकार्य केले पाहिजे. तरच आपण आपली राष्ट्रनिष्ठा कायम अबाधित ठेवू शकतो.
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम