नेरळ परीसरात मंडळ अधिकाऱ्यांचा स्तुत्य उपक्रम!गोरगरीब व गरजवंताना जीवनावश्यक वस्तुंचे वाटप!

कर्जत(धर्मानंद गायकवाड):- देशात कोरोना संकट परतवुन लावण्यासाठी १४ एप्रिल पर्यंत शासनाने देश लाॅकडाऊन केला आहे. त्यामुळे गोरगरीब जनतेचा काही ठिकाणी उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे विविध स्तरावरून या गोरगरीब जनतेला मदतीचा हात दिला जात आहे. अशाच प्रकारे नेरळचे मंडळ अधिकारी मानिक सानप यांनी आज नेरळ शहरातील काही परीसरात गोरगरीब जनतेला अन्नधान्य वाटप केले आहे.

          कर्जत तालुका तसा दुर्गम तालुका आहे. या तालुक्यांतील सुमारे ३० ते ४० टक्के लोकांचा उदरनिर्वाह मोलमजुरी करुन केला जात आहे. नेरळ परीसरातही हातमजुरी करुन अनेक जण उदरनिर्वाह करीत असतात. मात्र कोरोना व्हायरसने जगात थैमान घातल्याने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देश लाॅक डाऊनची घोषणा केली आहे. परीणामी देशात सर्व कामे व उद्योग धंदे बंद पडल्याने येथे मोलमजुरी करणाऱ्यांचे मोठे हाल होत आहेत. त्यामुळे शासनही या मोलमजुरी करणाऱ्यांवर उपासमारीची वेळ येवु नये याकरता शासनही अशा गरजूंना मदत करीत आहे. अशाच प्रकारे कर्जत तहसिल कार्यालयाचे विविघ कर्मचारी गरजूंना मदत करीत असल्याचे पाहावयास मिळत आहे.

          कर्जत तालुक्यांतील नेरळच मंडळ अधिकारी माणिक सानप यांनी आज नेरळ परीसरातील साईबाबा परीसरात जावुन गरजूंना सोशल डिस्टन्स खबरदारी घेवुन अन्नधान्याचे वाटप केले आहे. त्यामुळे गोरगरीबांना दिलासा मिळाला आहे. यावेळी नेरळ मंडळ अधिकारी यांच्यासमवेत मंडळ अधिकारी कार्यालयातील कर्मचारी कर्मचारी अशोक भगत व अन्य कर्मचारी येथे उपस्थितीत होते. सोशल डिस्टन्स पाळत या अन्नधान्याचे वाटप करण्यात आले आहे. यावेळी अनेक गोरगरीब जनेतेने या अन्नधान्याचा लाभ घेतला आसल्याची माहीती मंडळ अधिकारी माणिक सानप यांनी दिली आहे.

रिपोर्टर

  • Adarsh Maharashtra
    Adarsh Maharashtra

    Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.

    आदर्श महाराष्ट्र वेब टीम

संबंधित पोस्ट