माथाडी कामगारांना वेतन द्या : गुलाबराव जगताप
माथाडी कामगारांना मंडळामार्फत पगार द्या :
- by Adarsh Maharashtra
- Apr 01, 2020
- 1389 views
कळंबोली :देशावर व महाराष्ट्रावर कोरोनाचे संकट पसरले असून सर्व उद्योगधंदे बंद असल्याने लाखो माथाडी कामगार विनाकाम घरी बसून आहेत.
सरकारी कामगार कर्मचारी निमसरकारी कारखानदाराच्या कडील कामगारांना अस्थापनांना वेतन मिळते. त्याप्रमाणे माथाडी मंडळाने प्रत्येक कामगारांच्या खात्यावर मागीलम महिन्याच्या पगाराच्या सरासरीप्रमाणे पगाराची रक्कम जमा करण्यात यावी अशी मागणी माथाडी कामगार नेते
गुलाबराव जगताप यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, कामगार मंत्री व कामगार आयुक्त यांच्याकडे केली आहे.माथाडी कामगार हा समाजाच्या अत्यावश्यक गरजा पूर्ण करणारा महत्वाचा घटक असून प्रत्येक राष्ट्रीय आपत्तीत शासन व समाजाला मदत करणारा आहे. माथाडी कामगार हा सध्या प्रचंड अडचणीत असून मानसिक आर्थिक दडपणाखाली आहे. त्यामुळे इतर कामगार कर्मचाऱ्यांप्रमाणे शासनाने माथाडी कामगारांच्या खात्यात माथाडी बोर्डामार्फत सध्याच्या परिस्थितीतून बाहेर येईपर्यंत प्रत्येक महिन्याच्या १० तारखेच्या आत पगाराची रक्कम जमा करुन या कामगारांच्या पाठीशी सरकारने खंबीरपणे उभे राहणे गरजेचे असल्याचे जगताप यांनी निवेदनात म्हटले आहे
महाराष्ट्रातील तमाम कामगारांच्या
याबाबत तातडीने कामगारांच्या पाठीशी उभे राहून त्याप्रमाणे माथाडी मंडळाना आदेश काढण्यात यावेत अशी विनंती माथाडी कामगारांच्या वतीने करण्यात आली आहे
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम