नेरळ ग्रामपंचायतीने दिला अपंगाना मदतीचा हात! ९४ अपंग व्यक्तींना ४ लाख ७० हजार केले वाटप! अपंग व्यक्तींने केले समाधान व्यक्त!
- by Adarsh Maharashtra
- Apr 01, 2020
- 615 views
कर्जत(धर्मानंद गायकवाड):- रायगड जिल्ह्यातील विस्ताराने मोठी असणाऱ्या नेरळ ग्रामपंचायतीने नुकताच नेरळ परीसरातील अपंग व्यक्तींना नेरळ ग्रामपंचायतीने मदतीचा हात दिला आहे. येथे ५ टक्के अपंग कल्याण निधी मधुन सुमारे ९४ जणांना प्रत्येकी ५ हजार प्रमाणे सुमारे ४ लाख ७० हजार रुपयाची आर्थिक लाभ देणेत आला आहे. त्यामुळे अपंग लाभार्थ्यांनी येथे समाधान व्यक्त केले आहे.
याबाबत अधिक माहीती अशी की, नेरळ ग्रामपंचायत विकासाच्या द्रुष्टीकोणातुन एक पाऊल पुढे टाकत असताना या ग्रामपंचायत हद्दीतील अपंगाना उदरनिर्वाह करणेस मदत व्हावी याकरता नेरळ ग्रामपंचायतीचे सरपंच रावजी शिंगवा यांनी पुढाकार घेत आहे. नेरळ ग्रामपंचायतीचा वतीने नुकताच नेरळ ग्रामनिधी मधुन ५ टक्के योजनेतून अपंग कल्याण निधीद्वारे ४ लाख ७० हजार रुपयाचे धनादेशाचे वाटप केले आहे. ९४ अपंग लाभार्थ्यांनी याचा लाभ घेतला आहे. त्यामुळे ग्रामपंचायत च्या या उपक्रमाचे स्वागत नेरळ शहरातून केले जात आहे.
विशेष म्हणजे प्रत्येक अपंग लाभार्थ्यांला ५ टक्के अपंग कल्याण निधी अंतर्गत प्रत्येक ५ हजाराचा धनादेशाचे वितरण नुकताच नेरळ ग्रामपंचायतीने केले आहे. त्यामुळे सध्याचा संकट काळीन परिस्थितीती वेळेत हा मदतीचा हात अपंग व्यक्तींना मिळाल्याने अपंग व्यक्तींनी तसेच अपंग संघटना पदाधिकाऱ्यांनी ग्रामपंचायत प्रशासनाचे आभार मानले आहेत.
दरम्यान नेरळ ग्रामपंचायत कार्यालयात नुकताच अपंगाना हे धनादेश सरपंच रावजी शिंगवा यांचे हस्ते वाटप करण्यात आले आहे. यावेळी येथे काही ग्रामपंचायत सदस्य उपस्थितीत होते. तसेच पुढील कालात येथे १५ टक्के मधुन आणि १० टक्के निधी मधुनही नेरळ ग्रामपंचायत मार्फत मागसवर्गिय आणि महीलांना मदतीचा हात देणार असल्याचे सरपंच रावजी शिंगवा व नेरळचे ग्रामविकास अधिकारी एम. डी. गोसावी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले आहे.
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम