कोरोना संकट परतवुन लावण्यासाठी घरातच थांबा, सरकारचा सुचना पाळा; नेरळचा सरपंचाचे आवाहन!

सरपंच रावजी शिंगवा यांची थेट मुलाखत!

 कर्जत(धर्मानंद गायकवाड):- सध्या देशात कोरोनाचे प्रंचड मोठे जीवघेणे संकट आले असल्याने या संकटात प्रत्येकाने खबरदारी घेणे गरजेचे आहे. अशा परिस्थितीत सरकार प्रंचड या कोरोना विरोधात लढत आह. तसेच नागरीकांनीही या कोरोना विरोधाच्या लढ्यात सरकारच्या सुचनांचे पालन करावे, तसेच नागरीकांनी घरातच बसावे आणि सुरक्षित राहावे असे आवाहन रायगड जिल्ह्यातील सर्वात मोठी असणाऱ्या नेरळ ग्रामपंचायतीचे सरपंच रावजी शिंगवा यांनी केले आहे. कोरोना विरुद्धचा लढाईत नेरळ ग्रामपंचायत प्रशासनही हा कोरोना परतवुन लावण्यासाठी नेरळ ग्रामपंचायतीचे काय प्रयत्न आणि भुमिका आहे हे जाणुन घेणेसाठी पत्रकार धर्मानंद गायकवाड यांनी नेरळचे सरपंच रावजी शिंगवा यांची घेतलेली खास मुलाखत.

प्रश्न;- सध्या देशात कोरोना विषाणु व्हायरसने धुमाकुळ घातला आहे, याकडे तुम्ही कसे पाहाता?

सरपंच;- सध्या देशात कोरोना व्हायरसच्या विषाणुने सारेच प्रंचड चिंतेत आहे. तसेच या कोरोना व्हायरसचे नुसते संकट नसून हे संकट जीवघेणे आहे. त्यामुळे या संकटात स्वताचा बचाव करणेसाठी जनेतेने सतर्क राहुन घरातच बसावे, तरच

या संकटापासुन स्वताचा व कुटुंबाचा बचाव होईन, त्यामुळे हे संकट फार गंभीर आहे, आणि याचा गांभिर्याने विचार होणे गरजेचे असल्याने नेरळ प्रशासनही सरकारच्या सुचनांचा आदर करीत या संकटावर मात करणेसाठी एक पाऊल पुढे टाकणार आहे.

प्रश्न;- कोरोना व्हायरस च्या संकटात नेरळ ग्रामपंचायतीची आणि आपली सरपंच म्हणुन नेमकी भुमिका काय?

सरपंच;- कोरोना विषाणुंचा प्रादुर्भाव रोखणेसाठी नेरळ ग्रामपंचयात प्रशासनाने नेरळ मधील सर्व शासकीय आणि खाजगी वैद्यकीय तज्ञांची बैठक घेवून काही सुचना त्यांना करण्यात आल्या आहत. तसेच नेरळ गावात हा व्हायरस रोखण्यासाठी नेरळ ग्रामपंचायत अनेक उपोययोजना आखत आहे. नेरळच्या नागरीकांनीही सरकारचा सुचनांचे पालन करुन ग्रामपंचायतीला सहकार्य करावे, तसे झाल्यास नेरळ परीसरात या कोरोनाचे रुग्ण दिसणार नाही.

प्रश्न;- कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी नेरळ ग्रामपंचायती मार्फत काय उपोययोजना करण्यात आली आहे?

सरपंच;- कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्साठी नेरळ ग्रामपंचायत आणि नेरळ पोलिस ठाणे यांनी संयुक्तीकपणे नेरळ बाजारात अत्यावश्यक सेवेच्या वस्तु खरेदी करण्यासाठी बाजरात गर्दी करु नये याकरता  नेरळ शहरातील छत्रपती शिवाजी मैदानात अत्यावश्याक सेवेचा वस्तु म्हणजे पालेभाजी किराणा तसेच अन्य जीवनावश्यक वस्तुंची व्यवस्था केली आहे. तसेच जीवनावश्यक  वस्तु खरेदीसाठी गर्दी करु नये याकरता नागरीकांचा सुरक्षिततेसाठी या मैदानात सोशल डिस्टन्ट आखल्या आहेत. त्यामुळे कोरोनाचा पार्दुर्भाव रोखला जाणार आहे.

प्रश्न;- कोरोना विषाणु व्हायरस संसर्ग प्रतिबंध टाळतां येईन का? त्यासाठी आपल्या स्तरावरून काय प्रयत्न?

सरपंच;- सध्या कोरोना विषाणुंचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी ग्रामपंचयातीकडुन जनजाग्रुती करणेत येत आहे. तसेच नेरळ ग्रामपंचायत यांच्या वतीने संपुर्ण नेरळ शहरात मच्छर फवरणी तसेच निर्जंतुकीरण फवारणी करणेत येत आहे. त्यामुळे नेरळ परीसरात हे कोरोना विषाणुंचा प्रतिबंध या फवारणीने होणारं आहे. त्यामुळे नेरळ परीसरातील नाकरीकांनी प्रशासनास सहकार्य करुन घरात बसणे पसंत केले तर हा कोरोना संसर्गापासुन नक्कीच बचाव होईन. आणि हा संसर्ग टाळतां येईन असा मला विश्वास आहे.

प्रश्न:- सध्या कोरोना व्हायरस प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात लाॅकडाऊन आहे, त्यामुळे मोलमजुरी करणाऱ्यांवर उपासमारीची वेळ येणार आहे असे बोलले जाते, त्यामुळे याबाबत नेरळ ग्रामपंचायत आणि आपली भुमिका काय?

सरपंच;- नेरळ गावाचे आता शहरात रुपांतर होत आहे, त्यामुळे या शहरात अनेकांचा उदरनिर्वाह मोलमजुरी करुनच केला जात आहे. सध्या कोरोना व्हायरस रोखण्यासाठी देशात लाॅकडाऊन आहे. त्यामुळे अनेक जण मदतीचा हात ग्रामपंचायतीकडे मगत आहेत. त्यामुळे पुढील कालात नेरळ ग्रामपंचायत येथिल मागासवर्गिय व गरजू कुटुबांना १५ टक्केमधुन आणि १० टक्केमधुन उदरनिर्वाहासाठी जीवनावश्यक वस्तुंचे वाटप  करणेचा विचारात आहे. तसेच वयक्तीक स्थरावही आम्ही गोरगरीबांना मदत करीत आहोत.

प्रश्न;- नेरळचा जनतेचा कोरोना व्हायरस रोखण्यासाठी प्रतिसाद मिळतो की कसे?

सरपंच;- रायगड जिल्ह्यातील नेरळ ग्रामपंचायत विस्तारने मोठी ग्रामपंचायत आहे. त्यामुळे या ग्रामपंचायत परीसरात विविघ प्रभागात हा प्रादुर्भाव टाळण्याचा मोहीमेत नेरळ ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य, कर्मचारी तसेच नेरळचे पोलिस अधिकारी अविनाश पाटील व त्यांचे सर्व पोलिस कर्मचारी, आरोग्य खात्याचे कर्मचारी सहभागी असल्याने येथे जनता जमावबंदी आदेश व लाॅकडाऊन पाळत आहे. त्यामुळे बऱ्यापैकी येथे जनता घरातच बसुन आहे. त्यामुळे कोरोना व्हायरस प्रादुर्भाव संसर्ग टाळण्यासाठी जनतेचा येथे मोठा प्रतिसाद मिळत आहे.

प्रश्न;- कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी आपण नेरळचे सरपंच म्हणुन जनतेला काय आवाहन करणार?

सरपंच;- देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब, राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब, तसेच आरोग्य मंत्री राजेश टोपे साहेब, राज्याचे ग्रुहमंत्री अनिल देशमुख साहेब यासंह अनेक मंत्री तसेच केंद्र व राज्य शासनाचे विविध अधिकारी सरकारचा माध्यामातुन कोरोना व्हायरस विरुद्ध लढा देत आहेत. त्यामुळे जनतेला केवल सरकारला घरात बसुन साथ द्यावयाची आहे. त्यामुळे शासनाने केलेल्या सुचनांचे पालन जनतेने करावे, कोणीही घराबाहेर विनाकारण पडु नये, तसेच आपली आणि आपल्या कुटुबांची सुरक्षितता आपल्याच हाती आहे. त्यामुळे जनतेने घरातच बसुन आपली सुरक्षित बालगावी, बाजारात गर्दी करु नये, जीवनावश्यक वस्तु खेरदीचा नावाखाली फेरफटका बाहेर मारु नये, स्वच्छता राखावी, तोंडावर मास्क लावावे, वारंवार हात धुवावे असे आवाहन मी नेरळ आणि परीसरातील जनतेला करीत आहे. तसेच “घरी राहा, सुरक्षित राहा” असेही आवाहन सरपंच रावजी शिंगवा यांनी जनतेला केले आहे.

रिपोर्टर

  • Adarsh Maharashtra
    Adarsh Maharashtra

    Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.

    आदर्श महाराष्ट्र वेब टीम

संबंधित पोस्ट