
यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक स्थगित
- by Adarsh Maharashtra
- Mar 23, 2020
- 2914 views
यवतमाळ : दि २६ मार्च २०२० रोजी होणारी यवतमाळ जिल्हा बँकेची निवडणूक स्थगित करण्याचा आदेश सचिव राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण महाराष्ट्र राज्य पुणे यांनी नुकताच काढला असल्याने पुढील आदेशापर्यंत निवडणूक स्थगित करण्यात आली आहे.
निवडणुकीदरम्यान मतदाराची मोठ्या प्रमाणात गद्दी होऊन कोरोना या विषाणूचा संसर्ग होण्याची दाट शक्यता आहे. कोरोना या विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी राज्यातील पोलिस यंत्रणा व्यस्त असून सहकारी संस्थांच्या निवडणुकीत पोलिस बंदोबस्त उपलब्ध होणे शक्य नाही.
फौजदारी दंड संहिता प्रक्रिया १९७३ चे कलम १४४ लागू केल्यामुळे मतदारांनाही पारदर्शक भयमुक्त मोकळ्या वातावरणात निवडणूक प्रक्रियेमध्ये सहभागी होणे अशक्य ठरणार आहे. त्यामुळे महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम ७३ क ब व महाराष्ट्र सहकारी संस्था (समितीची निवडणूक) नियम २०१४ चे नियम ३(५) मधील तरतुदीनुसार प्राप्त अधिकाराचा वापर करून प्राधिकरण या प्रकरणी मा. उच्च/ सर्वोच्च न्यायालयाने सहकारी संस्थांच्या निवडणुका घेण्याबाबत आदेशीत केलेले आहे अशा सहकारी संस्थांची निवडणूक प्रक्रिया या टप्प्यावर असेल ज्या टप्प्यावर असेल त्या टप्यावर पुढील आदेशापर्यंत स्थगित करीत आहे. असे आदेश यशवंत गिरी, सचिव राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण महाराष्ट्र राज्य पुणे यांनी नुकतेच काढले आहेत याअगोदर निवडणूक प्राधिकरण यांच्याकडे जिल्हा उपनिबंधक तथा निवडणूक निर्णय अधिकारी यांनी निवडणुकीला स्थगिती मिळणे बाबत मार्गदर्शन मागविले होते.
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम