
आमदार महेंद्र थोरवे यांची उपजिल्हा रुग्णालयाला भेट!
कोरोना व्हायरस संदर्भात वैद्यकीय तज्ञांना केल्या सुचना!गर्दी करु नका, घरातच बसा, जनतेला केले आवाहन!
- by Adarsh Maharashtra
- Mar 23, 2020
- 1107 views
कर्जत(धर्मानंद गायकवाड):- सध्या कोरोना व्हायरस ने नको-नको केले असल्याने देशासह सर्व राज्यात आणि जिल्ह्यासह रायगड जिल्ह्यातही या कोरोना संसर्ग रोखण्यासाठी प्रचंड प्रयत्न शासन करीत आहे. त्यामुळे आज रायगडातील कर्जत तालुक्यांतही हा कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांनी आज कर्जत उपजिल्हा रुग्णालयातील भेट देवुन येथिल वैद्यकीय तज्ञांना खबरदारीचा काही सुचना केल्या आहेत.
देशाचे पंतप्रधान आणि राज्याचे मुख्यमंत्री यांच्या आदेशाने काल जनता कर्फ्यु यशस्वी झाल्यानंतर आता नागरीकांनी आपली जबाबदारी वाढवून खबरदारी घ्यावी असे आवाहन सरकार वांरवांर करीत आहे. त्यानुसार आज सकाळी कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे हेही कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी बाहेर पडले. आज सकाळीच कर्जत बाजारपेठेत आमदार महेंद्र थोरवेंनी गर्दीचा ठिकाणी जावुन नागरीकांनी गर्दी कमी करण्याचे आवाहनही जनतेला केले आहे.
तसेच कर्जत उपजिल्हा रुग्णालयात जावुन आमदारांनी येथिल विविध आजाराचा रुग्णांची भेट घेवुन त्यांची विचारपुस करुन येथिल वैद्यकीय तज्ञांना कोरोना व्हायरस संसर्ग रोखण्यासाठी काही महत्वाचा सुचनाही केल्या आहेत. कोरोना व्हायरसचा संसर्ग परतवुन लावण्यासाठी कर्जत खालापुर मधील जनतेनें सहाकार्य करावे, नागरिकांनी अनावश्यक घराबाहेर पडू नये अशा सुचनाही कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांनी केल्या आहेत. ३१ मार्च नंतर हा व्हायरस किती प्रमाणात वाढला आहे, हे स्पष्ट होणार असल्याने जनतेने आताच याची खबरदारी घेणेची गरज असल्याचेही आमदार थोरवे यांनी सांगितले.
दरम्यान जगात कोरोना व्हायरसने हाहाःकार माजवला असतानाच हा व्हायरस आता कसा थांबवायचा यासाठी शासन शासनस्तरावर प्रयत्न करीत असतानाच जनतेनेही शासनाचा सुचनांचे पालन करावे असा सल्लाही आमदारांनी दिला असुन रायगड प्रशासनही सतर्क राहीले असल्याचे दिसुन येत आहे. त्यामुळे घारातच बसुन रहा, अन्यथा हा कोरोना आपल्याला जीवन जगणे मुष्कील करण्याची शक्यता अाहे. त्यामुळे आता तरी कर्जतकरांनी घराबाहेर पडणे टाळा असे आवाहनही कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांनी कर्जत खालापुरकरांना केले आहे.
कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांनी आज कर्जत बाजारपेठेत गर्दीचा ठिकाणी जावुन नागरिकांना गर्दी न करण्याचे व घरात बसण्याचे आवाहन केले आहे. त्यानंतर आमदार थोरवे यांनी कर्जत उपजिल्हा रुग्णालयात जावुन येथिल वैद्यकीय तज्ञांना कोरोना व्हायरस रोखण्यासाठी काही सुचना केल्या आहेत. त्याप्रसंगी उपजिल्हा रुग्णालयात आमदार थोरवे व वैद्यकीय तज्ञ दिसत आहेत.
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम