
कोरोनामुळे जगात पहिल्यांदाच घडत आहेत 'या' दहा गोष्टी
- by Adarsh Maharashtra
- Mar 22, 2020
- 639 views
मुंबई : चीनमधून पसरलेला कोरोना विषाणू आज संपूर्ण जगासाठी धोकादायक ठरला (Ten big things about corona) आहे. या विषाणूने आतापर्यंत १५० पेक्षा अधिक देशांमध्ये शिरकाव केला आहे. तसेच आतापर्यंत दोन लाख ९० हजार लोकांना या विषाणूची लागण झाली आहे, तर यामधून ९३ हजार लोकं बरेही झाले आहेत आणि १२ हजारच्या आसपास लोकांचा मृत्यू झाला (Ten big things about corona) आहे.
या भयानक आजारामुळे संपूर्ण जगात अनेक ठिकाणी लॉकडाऊन करण्यात आले. या लॉकडाऊनमुळे जगातील प्रमुख शहरातील प्रदुषण कमी झाले आहे. या प्रदुषणात घट झाल्यामुळे अशा काही गोष्टी घडत आहेत ज्या पहिल्यांदाच घडल्या आहेत. जगातील अशाच काही दहा गोष्टी समोर आल्या आहेत ज्या यापूर्वी आधी कधी घडल्या नव्हत्या.
जगात पहिल्यांदाच घडत असलेल्या दहा गोष्टी
१) चीनच्या मोठ्या शहरांचं प्रदूषण ४५ वर्षानंतर पहिल्यांदाच कमी झालं आहे. कोरोनामुळे अनेक भागात तिथं लॉकडाऊन होतं. त्यामुळे कोट्यवधी लोक घरातच होते. सर्व वाहूतक व्यवस्थाही बंद होती. त्याचा परिणाम म्हणून बिजिंगसारख्या अनेक मोठ्या शहरांमधलं प्रदूषण घटलं आहे.
२) ६० वर्षात पहिल्यांदाच इटलीच्या व्हेनिस नदीत डॉल्फिन दिसला आहे. लॉकडाऊनमुळे व्हेनिस नदीतल्या बोटी आणि पर्यटन बंद झालं. त्यामुळे प्रदूषणाचं प्रमाण घटलं. कोरोनामुळे सर्वांचं मोठं नुकसान होत असलं तरी अनेक नद्यांच्या प्रदूषणात मात्र सुधारणा होते आहे.
३) लग्नाच्याच दिवशी नवरा-नवरी, फोटोग्राफर, मंडपवाला आणि काही वऱ्हाडींवर लातूरमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. जमावबंदीचा आदेश असतानाही इथं मोठ्या संख्येत वऱ्हाड जमलं होतं. त्यामुळे पोलिसांनी तात्काळ वधु-वरांना पुष्पहार घालयला लावले. आणि जमावबंदीचा आदेश धुडकावल्यामुळे गुन्हेही दाखल करुन घेतले.
४) कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर पहिल्यांदाच काही सैनिकांच्या सुट्ट्या १५ एप्रिलपर्यंत वाढवण्यात आल्या आहेत. तसंच ३५ टक्के ज्येष्ठ अधिकाऱ्यांनाही घरुनच काम करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. युद्धजन्य परिस्थितीत नेहमी सैनिकांच्या सुट्ट्या रद्द केल्या जातात. मात्र सुट्ट्यांमध्ये वाढ होण्याची ही पहिलीच घटना आहे.
५)गेल्या बुधवारी बांग्लादेशात प्रार्थनेसाठी २५ हजार लोक एकत्रं जमली होती. जगभरातले लोक एकत्र येण्याचं टाळत असताना बांग्लादेशातल्या या अजब कार्यक्रमावर टीका होत आहे. आपापल्या घरुनच प्रार्थना किंवा नमाज पठण करा, असं आवाहन केलं जात असताना. बांग्लादेशात २५ हजार लोकांनी एकत्र जमून कोरोना संपण्यासाठी नमाज पठण केलं.
६) कोरोनामुळे इराणमध्ये १० हजार कैद्यांची कायमस्वरुपी सुटका केली आहे. याआधी तिथं ७५ हजार लोकांना तात्पुरते सोडण्यात आले होते. आता त्यातल्या १० हजार लोकांना कायमस्वरुपी सोडण्यात येणार आहे. त्याशिवाय त्यांच्यावरचे सर्व खटलेही रद्द करण्यात येणार आहेत.
७) भारतीय संसदेचा प्रत्येक कोपरा-न-कोपरा पहिल्यांदाच धुतला जात आहे. संसद परिसराची एरव्ही सुद्धा साफसफाई होत असते. मात्र यावेळी कोरोनामुळे प्रत्येक भिंत आणि प्रत्येक खांब सॅनिटाईझ केला जात आहे. गायिका कनिका कपूर ज्या पार्टीत गेलेली, तिथं काही खासदारांची उपस्थिती होती. त्यामुळे सर्व खासदार आणि संसदेतला कर्मचारी वर्गही सतर्क झाला आहे.
८) भारतात पहिल्यांदाच इंधनाच्या मागणीत घट नोंदवली गेली आहे. विमानांच्या उड्डांणावर बंदी आहे. अनेक उद्योगही तात्पुरते बंद झाले आहेत. त्यामुळे डिझेलच्या मागणी १३ टक्के तर पेट्रोलच्या मागणीत १० टक्के घट झाली आहे. विमानांच्या इंधनाची मागणीही १० टक्क्यानं कमी झाली आहे.
९) मागच्या महिन्याभरात नमस्ते हा शब्द जगभरातल्या अनेक वर्तमानपत्रं आणि वृत्तवाहिन्यांनी वापरला गेला आहे. भारतीय परंपरेतल्या नमस्तेवर अनेक लेखही छापून आले आणि जगभरातल्या अनेक नेत्यांनीही कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी शेकहँडऐवजी नमस्तेचं आवाहनही केलं.
१०) ७२ वर्षांपासून आयोजित होणारा कान्स फिल्म फेस्टिव्ह पहिल्यांदाच पुढं ढकलण्यात आला आहे. १२ मे ला फेस्टिव्हलचं आयोजन होणार होतं. आता जून महिन्याच्या शेवटी किंवा जुलैच्या सुरुवातीला फेस्टिव्हलचं आयोजन होणार आहे.
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम