परळ मध्ये महिलांनी रक्तदान करून अनोख्या पद्धतीने केला जागतिक महिलादिन साजरा!
- by Adarsh Maharashtra
- Mar 16, 2020
- 1707 views
मुंबई:जीवनदाता सामाजिक संस्थेने जागतिक महिलादिनी के.ई.एम.रक्तपेढीत आयोजित केलेल्या रक्तदान शिबीरात महिलांनी मेघा उपस्थितीने रक्तदान करून अनोख्या पद्धतीने केला महिला दिन साजरा. मुंबईतच नव्हे तर अखख्या महाराष्ट्रात,असा उपक्रम कोणीही साजरा न केल्याने जीवनदाता सामाजिक संस्थेचा हा एक अभिनव उपक्रम ठरला.सस्थेने सोशल मिडिया आणि प्रिंट मिडिया आधारे दोन दिवसात चांगलाच हंगामा केला.त्यामुळे दुपारी १२ नंतर महिला रक्त दात्यांनी इतकी गर्दी केली होती की,रक्तदान शिबीर मंडपाला उत्साहाचे भरते आलेले दिसत होते.
जीवनदाता सामाजिक संस्थेचे रक्तदान मोहिमेचे हे चौदावे वर्षे आहे.या वर्षी थँलेसेमिया या दुर्धर रक्तदोष आजाराबाबत या शिबिराच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली. तसेच अनेक अंगणसेविकांनी लहान मुलांचं कुपोषण रोखण्यासाठी प्रयत्न करण्याची तसेच आपल्या आहाराची आणि आरोग्याची काळजी घेण्याची सामूहिक शपथही यावेळी घेण्यात आली.
घर आणि नोकरी अशा दुहेरी श्रमामुळे महिलांचे आपल्या आहाराकडे तसेच आरोग्याकडे होणा-या दुर्लक्षामुळे महिलांमध्ये हिमोग्लोबीनची कमतरता निर्माण होते. त्यामुळे अनेकदा महिला ह्या रक्तदानासाठी अपात्र ठरतात. तरीदेखील या शिबिराला महिलांनी दिलेला प्रतिसाद महत्त्वपूर्ण ठरला. यातील ६५ महिला रक्तदान करण्यात यशस्वी ठरल्या तर २२८ महिला ह्या हिमोग्लोबीनच्या कमतरतेमुळे रक्तदान करू शकल्या नाहीत. आणखीही बऱ्याच उत्साही महिलांना ब्लड प्रेशर व कमी वजन यामुळे रक्तदान करता आले नाही.असे जरी असले तरी मोठ्या संख्येने महिलांनी रक्तदानासाठी धाडस केल्याने ही संस्थेची रक्तदान मोहीम कुतूहलाची विषय ठरली.
सदर शिबिराला आमदार व भाजप नेते प्रसाद लाड, सिनेअभिनेत्री अस्मिता बोरकर, नाट्य व चित्रमालिका तसेच अनन्या नाटक फेम अभिनेत्री ऋतुजा बागवे , मा.नगरसेविका तसेच श्री सिद्धीविनायक मंदीर न्यासच्या विश्वस्त वैभवी चव्हाण ,ज्येष्ठ लेखक व साहित्यिक काशिनाथ माटल,जाणीव फाऊंडेशनच्या संस्थापिका तसेच सुप्रसिद्ध संपादिका सोनल खानोलकर यासह अनेक मान्यवरांनी या महिलांच्या रक्तदान सोहोळ्यास आपली उपस्थिती दर्शविली आणि जीवनदाता संस्थेच्या स्तुत्य उपक्रमाची प्रशंसा केली.हे शिबिर यशस्वी करण्यासाठी जीवनदाता च्या सर्व महिला कार्यकर्त्यांनी भरपूर मेहनत घेतली त्यामुळे महिलांनी महिलांसाठी आयोजित केलेले हे शिबीर जागतिक महिला दिनाला ख-या अर्थाने साजेसे ठरले.

रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम