घरबसल्या काम करण्याचे केले आवाहन मुंबई महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी
करोना प्रार्दुभाव लक्षात घेऊन महापालिकेने कंपन्यांना घरबसल्या काम सुरू करण्याचे आवाहन केले आहे. तसंच शाळा-महाविद्यालये, मॉल्स अशाठिकाणी लॉक डाऊन लागू करण्यात आला आहे.
- by Adarsh Maharashtra
- Mar 16, 2020
- 1758 views
मुंबई:सध्या महाराष्ट्रात दिवसेंदिवस करोना बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. मुंबईत तीन तर नवी मुंबईत एक नव्याने करोना रुग्ण आढळला आहे. याशिवाय यवतमाळ मध्येही अजून एक रुग्ण आढळल्यामुळे राज्यात करोनाची संख्या आता ३३ वरुन ३८ वर गेली आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेचे आयुक्त प्रवीण परदेशी यांनी सोमवारी सर्व कंपन्यांना घर बसल्या काम सुरू करण्याचे आवाहन दिले आहे
.प्रवीण परदेशी म्हणाले की, आम्ही कंपन्यांना घरबसल्या काम करण्याचा सल्ला दिला आहे. जर गरज भासली तर पुढील काळात हे अनिवार्य करू.
करोनाचा प्रार्दुभाव लक्षात घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खासगी क्षेत्रातील कंपन्यांना घरबसल्या काम करण्याचे आवाहन केले आहे. यामुळे राज्यात जास्तीत जास्त करोना बाधित रुग्ण आढळलेल्या ठिकाणी म्हणजेच मुंबई, पुणे, नागपूर या तीन शहरांमध्ये परिवहन यंत्रणेवर नियंत्रित करण्यात मदत होऊ शकेल.
जे परदेशातून प्रवास करून आले आहेत त्यांना त्यांच्या घरी ‘सेल्फ-क्वारेन्टाईन’ मध्ये ठेवलं आहे. त्यामध्ये सुमारे ६०० लोक आहेत. करोनाची लक्षणे दिसणाऱ्या प्रवाशांना वेगळे ठेवण्याचे नियम लागू होती. तसंच लक्षणे न दिसणाऱ्या प्रवाशांना १४ दिवसांसाठी पाठपुराव करणे आवश्यक आहे, असं परदेशी म्हणाले.
विविध सरकारी रुग्णालयात करोनाची चाचणी करण्याची क्षमता वाढवून खासगी रुग्णालयांमध्येही सुविधांचा विस्तार करण्याचीही महापालिकेची योजना आहे. तसंच परदेशी म्हणाले की, सध्या शाळा-महाविद्यालयीने परीक्षा नियोजित वेळेनुसार सुरू असताना शाळा, महाविद्यालये, मॉल्स, जलतरण तलाव आणि जिम इत्यादी ठिकाणी लॉक डाऊन लागू करण्यात आला आहे.

रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम