राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 26 वर, मुंबईत आणखी चौघांना कोरोनाची लागण
राज्यात दिवसभरात कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत वाढ झाली (Corona Virus Update) आहे. राज्यात 13 मार्च ते 14 मार्च दरम्यान तब्बल 9 रुग्ण आढळले आहे
- by Adarsh Maharashtra
- Mar 14, 2020
- 2396 views
मुंबई : राज्यात दिवसभरात कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत वाढ झाली (कॉरोन विरस उपडते) आहे. राज्यात 13 मार्च ते 14 मार्च दरम्यान तब्बल 9 रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे राज्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 26 वर पोहोचली आहे. नुकतंच मुंबईत 4 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आलं आहे. तर अहमदनगर 1, यवतमाळ 2 आणि मुंबईत 1 असे चार रुग्ण भरती आहेत.
आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात दिवसभरात (Corona Virus Update) कोरोनाबाधित 9 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 26 झाली आहे. यात 4 जण पुण्यातील असून हे पहिल्या 2 कोरोनाबाधित रुग्णांसोबत दुबई सहलीला गेलेल्या चमूपैकी आहेत. तर यापैकी अहमदनगर 1, यवतमाळ 2 आणि मुंबईत 1 रुग्ण भरती आहे. या चौघांशिवाय मुंबईत आणखी 4 जण कोरोनाबाधित आढळले आहेत. यात हिंदूजा रुग्णालयात भरती असलेल्या आणि दुबई प्रवासाचा इतिहास असलेल्या रुग्णांची पत्नी आणि मुलगा यांचा समावेश आहे.
महाराष्ट्रातील सर्व शाळा-कॉलेज ३१ मार्चपर्यंत बंद, ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर सरकारचा निर्णयमुंबईत आढळलेले इतर दोन रुग्ण हे 37 आणि 59 वर्षांचे पुरुष आहेत. त्यांचा अनुक्रमे अमेरिका, फ्रान्स आणि फिलिपाईन्स प्रवासाचा इतिहास आहे. नागपूर येथे भरती झालेला आणि कतार देशात प्रवासाचा इतिहास असलेला एक 43 वर्षीय पुरुष ही कोरोना बाधित असल्याचा सांगितले आहे. आज कोरोना बाधितांपैकी एक महिला आहे.
कोरोनाचे कुठे किती रुग्ण?
- मुंबई – 5
- ठाणे – 1
- कल्याण – 1
- नवी मुंबई – 2
- पुणे – 10
- अहमदनगर – 1
- नागपूर – 4
- यवतमाळ – 2
महाराष्ट्रात कुठे आणि कधी कोरोनाचे रुग्ण आढळले?
- पुण्यातील दाम्पत्य (2) – 9 मार्च
- पुण्यातील दाम्पत्याची मुलगी (1) – 10 मार्च
- पुण्यातील कुटुंबाचा नातेवाईक (1)– 10 मार्च
- पुण्यातील कुटुंबाला नेणारा टॅक्सी चालक (1)– 10 मार्च
- मुंबईतील सहप्रवासी (2) – 11 मार्च
- नागपूर (1) – 12 मार्च
- पुणे (1) – 12 मार्च
- पुणे (3) – 12 मार्च
- ठाणे (1) – 12 मार्च
- मुंबई (1) – 12 मार्च
- नागपूर (2) – 13 मार्च
- पुणे (1) – 13 मार्च
- अहमदनगर (1) – 13 मार्च
- मुंबईत (1) – 13 मार्च
- नागपूर (1) – 14 मार्च
- यवतमाळ (2) – 14 मार्च
- मुंबई (1) – 14 मार्च
- वाशी (1) – 14 मार्च
- पनवेल (1) – 14 मार्च
- कल्याण (1) – 14 मार्च
- एकूण – 26 कोरोनाबाधित रुग्ण
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम