
मस्जिद बंदर रेल्वे स्टेशन पादचारी पूल चकाचक होऊन प्रवाशांसाठी खुला.....
- by Sanjay Pachouriya
- Mar 14, 2020
- 1277 views
मुंबई (प्रतिनिधी): मस्जिद बंदर रेल्वे स्टेशन पुलावरील येण्या जाण्यासाठीची पादचारी मार्गिका बंद असलेल्या ठिकाणी येथे कचरा साम्राज्य पसरले होते.हे निदर्शनास येताच महाराष्ट्र् नवनिर्माण सेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी काही दिवसांपूर्वी मस्जिदबंदर रेल्वे स्टेशन प्रबंधक श्री.थापर यांची भेट घेऊन याची सविस्तर माहिती देण्यात आली होती.अखेर मनसेच्या या पाठपुराव्याला यश आले असून पादचाऱ्यांसाठी बंद असलेला हा मार्ग रेल्वे प्रशासनाकडून खुला करण्यात आला आहे तसेच खुला करण्यात आलेल्या या पादचारी मार्गिके वरील कचरा आणि घाणीचे साम्राज्य नष्ट झाले आहे
सेंट्रल मार्गावरील रेल्वेचे महत्वाचे असे हे स्टेशन रोज व्यापारी आणि माणसांच्या गर्दीने फुलून गेलेले असल्याने रोज हजारो प्रवासी या स्थानकातून ये-जा करत असतात .आता ही पादचारी मार्गिका खुली झाल्याने तसेच स्वच्छ झाल्याने सर्व स्तरातून महाराष्ट्र् नवनिर्माण सेनेच्या या कार्याचे कौतुक होत आहे.
रिपोर्टर
Reporter
आदर्श महाराष्ट्र वेब टीम