मालमत्ता थकवणाऱ्या थकबाकीदारांच्या गाड्या जप्त १७ गाड्या जप्त करताच थकबाकीदारांनी भरले ५ कोटी रुपये ७ दिवसात गाड्या न सोडवल्यास होणार लिलाव
- by Sanjay Pachouriya
- Mar 12, 2020
- 1201 views
मुंबई (प्रतिनिधी) : मालमत्ता कर न भरणाऱ्यांविरोधात यंदा प्रथमच अधिक कठोर पावले उचलणाऱ्या महापालिकेने थकबाकीदारांची वाहने, फर्निचर, टीव्ही, फ्रीज आदी वस्तू जप्त करण्यास गेल्या काही दिवसांपासून सुरुवात केली आहे. याच अनुषंगाने मुंबईतील अनेक विभागात मालमत्ता कराच्या थकबाकी वसूलीसाठी गाड्या जप्तींची कारवाई तीव्र करण्यात आली असून तब्बल १७ लक्झरी गाड्या जप्त करण्यात आल्या आहेत. त्यापोटी सुमारे ५ कोटी रुपये वसूल करण्यात पालिकेला यश आलेले आहे. ज्यांनी ७ दिवसात मालमत्ता कराची थकबाकी भरुन गाड्या सोडवून न घेतल्यास पालिकेकडून थकबाकी वसूलीसाठी गाड्यांच्या लिलावाची प्रक्रिया सुरु करण्यात येणार आहे .
या १७ गाड्यांपैकी बहुतेक गाड्या मर्सिडीज, ऑडी, होन्डासिटी, स्
यापैकी फेलीक्स गेराल्ड ऍण्ड क्लारा यांनी सर्व ६५ लाख रुपयांची थकबाकी गाड्या जप्त करताच भरली. शमा बिल्डर्स यांनी ३ कोटी ७९ लाखापैकी १ कोटी ९० लाख रुपये पालिकेकडे जमा केले. तर नरोज डेव्हलपर्सनेही १ कोटी ६ लाखापैकी रुपये ७८ लाख, लष्करीया बिल्डर्सने ८० लाखापैकी रुपये ५० लाख, इसीएच सिल्क मिल्सने १ कोटी ९० लाखापैकी ५० लाख रुपये आणि दर्शन टॉवर्सने ७२ लाखापैकी ४६ लाख भरुन आपापल्या गाड्या सोडवून घेतल्या. उर्वरित थकबाकी लवकरच भरण्याची हमीही त्यांनी दिलेली आहे.
रिपोर्टर
Reporter
आदर्श महाराष्ट्र वेब टीम