वांद्रे आणि अंधेरी पश्चिम भागातील गाळेधारकांवर धडक कारवाई क्रिस्टल मॉल आणि लक्ष्मी प्लाझा यांनी भरले १ कोटी ९१ लाख

मुंबई (प्रतिनिधी): मालमत्ता कर न भरणाऱ्यांविरोधात पाणी पुरवठा खंडीत करण्याशिवाय यंदा प्रथमच अधिक कठोर पावले उचलणाऱ्या महापालिकेने थकबाकीदारांची वाहनेफर्निचरटीव्हीफ्रीज आदी वस्तू जप्त करण्यास गेल्या काही दिवसांपासून सुरुवात केली आहेयाच अनुषंगाने 'एच पश्चिमविभागातील क्रिस्टल पॅराडाईज शॉपर्स मॉल आणि अंधेरी पश्चिमच्या लक्ष्मी इंडस्ट्रीयल इंस्टेटमधील मालमत्ता कर थकवणा-या गाळ्यांवर धडक कारवाई  केलीपरिणामीक्रिस्टल पॅराडाईज शॉपर्स मॉलमधील १६७ गाळेधारकांनी सुमारे रुपये १ कोटी ७८ लाखांचे धनादेश पालिकेला भरला  तर अंधेरीच्या लक्ष्मी इंडस्ट्रीयल इंस्टेटमधील लक्ष्मी प्लाझा या गाळेधारकाने रुपये साडे बारा लाखाचा भरणा पालिकेकडे भरला 

           वांद्रे पश्चिमच्या लिकिंग रोडवर असलेल्या क्रिस्टल पॅराडाईज शॉपर्स मॉलमधील गाळेधारकांकडे मालमत्ता करापोटी रुपये ४ कोटी ८ लाख थकबाकी होतीतर लक्ष्मी प्लाझा या गाळेधाराकाकडे रुपये २५ लाखाची थकबाकी होतीमहापालिकेच्या नियमांनुसार अनेकदा नोटीस बजावून व वारंवार सूचना देऊन देखील कंपनी कर भरायला टाळाटाळ करीत होतीपरंतुत्यांची चल संपत्ती जप्त करण्याची प्रक्रिया सुरु करताच क्रिस्टल मॉलमधील १६७ गाळेधारकांनी  १ कोटी ७८ लाखाचे धनादेश पालिकेकडे भरला   तर लक्ष्मी प्लाझाच्या मालकानेही २५ लाखापैकी साडे बारा लाख रुपये पालिकेकडे भरले दोन्ही ठिकाणी उर्वरित मालमत्ताकराचा भरणाही लवकरच करण्याची हमी देण्यात आली आहे.

नागरिकांना विविध नागरी सेवा-सुविधा अव्याहतपणे देणाऱ्या बृहन्मुंबई महानगरपालिकेकडे जमा करावयाचा मालमत्ता कर भरावयास टाळाटाळ करणाऱ्यांवर महापालिकेची धडक कारवाई गेल्या काही दिवसांपासून नियमितपणे सुरू आहेया कारवाई अंतर्गत महापालिकेच्या सव्वाशे वर्षांच्या इतिहासात यंदा प्रथमच चल संपत्ती जप्त करण्याची कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला आहेत्यानुसार महापालिका क्षेत्रात मालमत्ताकर थकबाकीदारांवर कठोर कारवाई करण्यात येत आहेवाहन वा इतर वस्तू जप्ती सारखी अप्रिय कारवाई होऊ नयेयासाठी मालमत्ता कर थकबाकी दारांनी शेवटच्या तारखेची वाट न बघता मालमत्ता कर तातडीने महापालिकेकडे जमा करावाअसे आवाहन महापालिका प्रशासनाने द्वारे करण्यात येत आहे.



रिपोर्टर

संबंधित पोस्ट