कोरोना व्हायरस .मुंबईत कोरोनाचे दोन रुग्ण . कस्तुरबा रुग्णालयात उपचार सुरु

मुंबई (प्रतिनिधी): कोरोना व्हायरसने जगभरात हाहाकार उडवला आहे. या व्हायरसने भारतातही शिरकाव केला आहे. भारतात या व्हायरसचे ५० हुन अधिक रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी पाच रुग्ण महाराष्ट्रात आहेत. दोन दिवसापूर्वी पुण्यात आढळलेल्या २ रुग्णांच्या संपर्कात आलेल्या सहा जणांना मुंबई महापालिकेच्या कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यापैकी २ जणांच्या रक्ताच्या चाचणीचा रिपोर्ट पॉझीटीव्ह आला आहे. या दोघांच्या रक्ताच्या पुन्हा चाचण्या केल्या जात असल्याची माहिती मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून देण्यात अली आहे.

चीन मधील हुवांग प्रांतात आढळून आलेला कोरोना व्हायरस जगभरात पसरला आहे. यामुळे आतापर्यंत हजारो लोकांचा मृत्यू झाला आहे. भारतातही या व्हायरसचे रुग्ण आढळून आले आहेत. महाराष्ट्रात आता पर्यंत कोरोनाची बाधा झालेले ५ रुग्ण आढळून आले आहेत. त्यांच्यावर पुण्याच्या नायडू रुग्णालयात उपचार सुरु आहेत. यामध्ये दुबई येथून आलेल्या दोन जणांना समावेश आहे. या दोघांच्या संपर्कात आलेले सहा रुग्ण मुंबई महापालिकेच्या कस्तुरबा रुग्णालयात दाखल आहेत. त्यांच्या रक्त चाचण्या करण्यात आल्या आहेत. सहा पैकी ४ जणांच्या रक्ताच्या चाचण्या निगेटिव्ह आल्या आहेत. त्यानंतरही या चार जणांना आणखी तीन दिवस रुग्णालयात देखरेखीखाली ठेवले जाणार आहे. इतर दोन जण हे जेष्ठ नागरिक आहेत. त्यांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून ज्ञेयात आली आहे. या दोन जणांना विलीगीकरण कक्षात इतर संशयित रुग्नांपासून वेगळे ठेवले जाणार आहे. या दोघांच्या रक्ताची चाचणी पुन्हा करण्यात आली आहे. त्याचे रिपोर्ट येत्या काही तासात येतील असे पालिका प्रशासनानाने कळविले आहे.    

पालिकेची यंत्रणा सज्ज
पालिकेच्या कस्तुरबा रुग्णालयात २८ बेडची व्यवस्था असून ‘कोरोना’ रक्तचाचणीही करण्यात येत आहे. शिवाय आपत्कालीन स्थितीसाठी पालिकेच्या महत्त्वाच्या रुग्णालयांसह खासगी रुग्णालयांमध्ये व्यवस्था करण्यासाठी आराखडा तयार ठेवला आहे. याचबरोबर ‘कोरोना’चा मुकाबला करण्यासाठी पालिकेने राजावाडी, कुर्ला भाभा, वांद्रे भाभा आणि जोगेश्वरी येथील ट्रॉमा केअर या रुग्णालयांमध्ये विशेष कक्ष सज्ज ठेवले असल्याची माहितीही पालिका प्रशासनाकडून देण्यात आली.

तर कस्तुरबा रुग्णालयात उपचार घ्या
‘कोरोना’ व्हायरसची लागण झाल्यास सर्दी, ताप, खोकला आणि श्वसनालाही त्रास होतो. न्युमोनियासारख्या या आजारात मूत्रपिंडही निकामी होऊ शकते. त्यामुळे सर्दी, खोकला, ताप अशा आजारांत पाच दिवस औषधोपचार करूनही आराम पडला नाही तर कस्तुरबा रुग्णालयात उपचार घ्यावेत असे आवाहन पालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

रिपोर्टर

संबंधित पोस्ट