कोरोना संदर्भात पालिकेकडून दिशाभूल
भाजप नगरसेविका ज्योती अळवणी यांचा हरकतीचा मुदा
- by Adarsh Maharashtra
- Mar 12, 2020
- 1031 views
मुंबई(प्रतिनिधी): कोरोना व्हायरसमुळे जगभरात थैमान माजलेले असतांना पालिका कोरोना संदर्भात नागरिकांची दिशाभूल करत असल्याचा हरकतीचा मुदा भाजपाच्या नगरसेविका ज्योती अळवणी यांनी बुधवारी स्थायी समितीत उपस्थीत केला.पालिका अतिरिकत आयुकतांनी त्यांच्या हरकतीच्या मुदयाला पुढील बैठकीत लेखी उत्तर दयावे असे निर्देश अध्यक्ष यशवंत जाधव यांनी दिले आणि हा हरकतीचा मुद्दा राखून ठेवला.
पालिकेने मुंबईत काही फलक लावले असून प्राण्यांपासूनही कोरोना होत असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.पालिका कोरोना संदर्भात दिशाभूल करत आहे.असा हरकतीचा मुदा भाजप नगरसेविका ज्योती अळवणी यांनी उपस्थीत केला.पालिकेच्या अशा प्रकारामुळे आता प्राण्यासंदर्भात नागरिकांत गैरसमज पसरतील आणि त्यांना नागरिक पाळणार नाहीत व रस्त्यावर सोडून देतील किंवा मारून टाकतील असे त्या म्हणाल्या.प्राण्यांना सांभाळणे जबाबदारी आहे.त्यामुळे प्राण्यामुळे कोरोना संसर्ग होउ शकतो अशा आशयाचा गैरसमज पसरविण्यात येत आहे तो बंद करण्यात यावा असे देखील त्या म्हणाल्या.स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी ज्योती अळवणी यांना प्रशासनाने लेखी उत्तर दयावे असे निर्देश अतिरिक्त आयुक्तांना दिले आणि हा हरकतीचा मुदा राखून ठेवला.
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम