शिवाजी पार्क झाले 'छत्रपती शिवाजी महाराज पार्क' ; नामविस्ताराचा प्रस्ताव पालिका सभागृहात मंजूर
- by ujwala
- Mar 11, 2020
- 1027 views
मुंबईच्या दादर येथे शिवाजी पार्क हे प्रसिद्ध असे मैदान आहे. सामान्य नागरिकांपासून राजकीय नेत्यांचे हे आवडीचे असे हे मैदान आहे. या मैदानाला शिवाजी पार्क असे संबोधले जायचे यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केला जात असल्याने या उद्यानाचे नाव 'छत्रपती शिवाजी महाराज पार्क' असे केले जावे अशी मागणी स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी केली. या मागणीला पालिका सभागृहात सर्वपक्षीय नगरसेवकांनी पाठिंबा दिल्याने आता या मैदानाला 'छत्रपती शिवाजी महाराज पार्क' असे संबोधले जाणार आहे.
दादर येथे शिवाजी पार्क हे मैदान १९२५ मध्ये मुंबई नगर पालिकेने जनतेसाठी खुले केले. याचे मूळ नाव माहीम पार्क असे होते. या मैदानावर समुद्राच्या बाजूस छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा १९६६ मध्ये उभारण्यात आला. या मैदानावर राज्य सरकारचे अनेक शासकीय कार्यक्रम होतात. अशा या मैदानाला शिवाजी पार्क असे नाव देण्याचा प्रस्ताव पालिकेच्या सभागृहात १० मे १९२७ ला मंजूर करण्यात आला. त्यानंतर या मैदानाला आता पर्यंत शिवाजी पार्क या नावाने संबोधले जात होते. या नावामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान होत असल्याने हा प्रस्ताव आज सभागृहात पुन्हा ओपन करून छत्रपती शिवाजी महाराज पार्क असे नाव करावे अशी उपसूचना स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी मांडली. या उपसूचनेला सर्व पक्षीय नगरसेवकांनी पाठिंबा दिला. यामुळे या मैदानाचे नाव छत्रपती शिवाजी महाराज पार्क असे करण्याला पालिका सभागृहात एकमताने मंजुरी मिळाली. आता हे मैदान छत्रपती शिवाजी महाराज पार्क या नावाने ओळखले जाणार आहे.
शिवाजी पार्क या मैदानावर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सलग ४० वर्ष शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात शिवसैनिकांना संबोधित केले आहे. राज्यात सध्या अस्तित्वात असलेले महाविकास आघाडीच्या सरकारचा शपथविधीही या मैदानावर झाला होता. याच मैदानात क्रिकेटचा सराव केलेले सचिन तेंडुलकर, विनोद कांबळी, संदीप पाटील, किरण मोरे आदी क्रिकेटरांनी क्रिकेट विश्वात भारताच्या नावाचा लौकिक केला आहे. याच मैदानावर राजकीय सभा घेण्यासाठी अनेक राजकीय पक्ष आणि नेते प्रयत्नशील असतात. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी ६ डिसेंबरला देशभरातून लाखो भीम अनुयायी चैत्यभूमीला अभिवादन करण्यासाठी येत असतात. हे मैदान लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचे लोकप्रिय स्थळ आहे. हल्ली या मैदानाला शिवसेनावाले शिवतीर्थ म्हणतात. शिवाजी पार्कचा कट्टा तरुण मंडळींसाठी तारुण्यसुलभ गप्पांची जागा, तर वयस्कर मंडळींसाठी सकाळ-संध्याकाळच्या फेरफटक्यानंतर विश्रांतीचा थांबा आहे.

रिपोर्टर
REPORTER
आदर्श महाराष्ट्र वेब टीम