लालबाग परळ विभागात प्रसिद्ध कलावंत आणि तंत्रज्ञ यांच्या उपस्थितीत होलीकोत्सव पारंपारिक रित्या संपन्न ...!
- by Sanjay Pachouriya
- Mar 11, 2020
- 609 views
मुंबई (प्रतिनिधी ): लालबाग परळ सांस्कृतिक मंच स्पार्क ग्रुप ऑफ एंटरटेनमेंट आणि राशी स्टुडिओ यांच्या संयुक्त विद्यमाने गोदरेज ग्राउंड शेजारी , त्रिवेणी शाळा मैदान , करिरोड येथे प्रसिद्ध कलावंत आणि तंत्रज्ञ यांच्या उपस्थितीत पारंपारिक आणि सांस्कृतिक पद्धतीने होलीकोत्सव साजरा करण्यात आला. सध्या कोरोना या जीवघेण्या रोगाची साथ हवेप्रमाणे पसरत असल्यामुळे केवळ सणाचे औचित्य न राखता या कोरोनाचा नायनाट कसा होईल हे उद्दीष्ट बाळगून विविधरुपी रंगांची उधळण करून या ठिकाणी जल्लोष साजरा करण्यात आला. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष सचिन पाताडे , उपाध्यक्ष अमीर हडकर , सर चिटणीस विलास चौकेकर , स्थानिक नगरसेवक अनिल कोकीळ , ज्येष्ठ संगीतकार अशोक दादा वायंगणकर , डॉ.किशोर खुषाले , प्रसिद्ध कलावंत कांचन पगारे , सुशांत शेलार , सुरेश डाळे पाटील , दिग्दर्शक महेश्वर तेटांबे , प्रसिद्ध अभिनेत्री म्रुणालीनी जांभळे , सिद्धी चव्हाण , मृणाल चव्हाण , संगीत संयोजक अमीर हडकर , ज्येष्ठ वादक गोविंद हडकर , सचिन भांगरे , नृत्य दिग्दर्शक सचिन गजमल , शितल माने , सुनिल देवळेकर , नितीन जाधव , कश्यप तांबे , स्मिता चव्हाण आदी कलावंत आणि तंत्रज्ञ मान्यवर उपस्थित होते. सिद्धी आणि मृणाल या बाल नृत्यांगनानी सदाबहार नृत्य सादर करून उपस्थित कलावंतांची मने जिंकून घेतली. तर या संपूर्ण कार्यक्रमाचे निवेदन प्रसिद्ध निवेदक तपस्वी राणे यांनी आपल्या खुमासदार वाणीने करून कार्यक्रमात रंगत आणली. अशा तऱ्हेने हा होलीकोत्सव पारंपारिक आणि सांस्कृतिक पद्धतीने साजरा करण्यात आला...!
रिपोर्टर
Reporter
आदर्श महाराष्ट्र वेब टीम