शोखा नाखरे यांच्या अनुभवातून रंगला मुलुंडमध्ये `स्त्री शक्तीचा जागर'
- by Sanjay Pachouriya
- Mar 09, 2020
- 1285 views
मुलुंड (प्रतिनिधी) : देहविक्रय करणा-या महिला, कारागृहातील अनुभव, दिव्यांग मुलांचे कर्तृत्व ऐकून सर्वजण निःशब्द झाले, भारावून गेले तसेच मैफिलींचे, निवेदनातले अनुभव, किस्से ऐकताना मन मोहरुन गेले. निमित्त होते ज्येष्ठ लेखिका व निवेदिका शोखा ऩाखरे यांच्या रंगतदार अनुभवातून साकारला गेलेला `स्त्री शक्तीचा जागर'.
मुलुंड येथील मराठा मंडळ या ज्ञाती संस्थेच्या वतीने सांस्कृतिक केंद्रात झालेल्या या कार्यक्रमात माझी आनंदयात्रा या विषयावर त्या बोलत होत्या. शोभा नाखरे यांनी आतापर्यंत अनेक मुलाखती घेतल्या आहेत, अनेक गाण्यांच्या कार्यक्रमांत निवेदन केले आहे, मूकबधिर मुलांच्या शाळेत शिकवत असताना त्यांना आलेले भावस्पर्शी अनुभव किस्से आणि छानशा कविता त्यांनी सादर केल्या. या त्यांच्या प्रवासात त्यांना खूप मोठा आनंदाचा ठेवा मिळाला. त्यांचे अत्यंत प्रभावी व श्रवणीय असे दोन तासांचे सादरीकरण त्यांनी यावेळी केले.
यावेळी वंदना लोटणकर, उज्जवला साटम यांचा तसेच चतुर वहिनी स्पर्धेतील प्रथम विजेत्या शिल्पा नलावडे यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोनाली संतोष सावंत व शुभदा म्हामुणकर यांनी केले. चित्रा धुरी यांनी प्रास्ताविक केले. मंडळाचे अध्यक्ष रमेश शिर्के यांनीही मनोगत व्यक्त केले. आभार माधुरी तळेकर यांनी मानले.
रिपोर्टर
Reporter
आदर्श महाराष्ट्र वेब टीम