
वंचितला लागलेली घरघर वाढली
माजी आमदार हरिदास भदे यांचा राष्ट्रवादीत प्रवेश
- by Reporter
- Mar 09, 2020
- 522 views
मुंबई (प्रतिनिधी) : लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेस, भाजपा, राष्ट्रवादी सारख्या मोठ्या राष्ट्रीय पक्षांच्या तोंडाला फेस आणणाऱ्या प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीला लागलेली घरघर वाढतच चालली असून काल अकोल्याचे माजी आमदार हरदास भदे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला
दलित मुस्लिम बहुजन यांना एकत्र करून प्रकाश आंबेडकर आणि ओवैसी यांनी वंचित आघाडी स्थापन केली या वंचित आघाडीने महाराष्ट्रात जे मेळावे घेतले त्यांना लाखोंची गर्दी व्हायला लागली त्यानंतर लोकसभा निवडणुकी मध्ये वंचितचे उमेदवार इम्तियाज जलील यांनी शिवसेनेचे मातब्बर खासदार चंद्रकांत खैरे यांच्या औरंगाबाद मतदार संघात पराभव केला तर महाराष्ट्राच्या उर्वरित ४७ लोकसभा मतदार संघात वंचितने दुसऱ्या किंवा तिसऱ्या क्रमांकाची मते घेतली त्यामुळे वंचितचा प्रचंड बोलबाला झाला पण विधानसभा निवडणुकीत तिकीट वाटपावरून एमआयएम वंचित मधून बाहेर पडली आणि त्यानंतर वंचितला जी घरघर लागली ती सुरूच आहे. मुंबई मधील हजारो कार्यकर्ते वंचित मधून बाहेर पडले तर इतर शहरांमध्येही मोठ्या संख्येने वंचितच कार्यकर्ते आणि पदाधिकारी फुटले आणि काल माजी आमदार हरदास भदे यांनी वंचीतला कायमचा रामराम करून शरद पवारांच्या उपस्थितीतच घड्याळ हातावर बांधले. या सर्व राजकीय घडामोडीने वंचितच पुढे काय होणार याचीच सध्या महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.
रिपोर्टर