पालिका प्रशासनाने पाच दिवसांचा आठवडा करताना घातलेल्या अटी व शर्थी अमान्य
कामगार कर्मचारी समन्वय समितीचे आयुक्तांना निवेदन
- by Sanjay Pachouriya
- Mar 05, 2020
- 369 views
मुंबई (प्रतिनिधी): मुंबई महानगरपालिकेनेही कामगार कर्मचाऱ्यांसाठी पाच दिवसांचा आठवडा लागू करण्याबाबतची प्रक्रिया सुरू करून पालिका सभागृहात मंजुरी साठी सादर करण्यात येणार आहे. पण प्रशासनाने यासंबंधीचे जे परिपत्रक काढले आहे त्यात रोज कामाचा दीड तास वाढवणार आहेत, आठ नैमत्तिक रजा कमी करणार असल्याचे आम्हाला समजले आहे.त्यामुळे या पाच दिवसांचा आठवडा करताना हा जो अन्यायकारक निर्णय घेण्यात आला आहे.तो आम्हाला मान्य नाही त्यास पालिका कामगार कर्मचाऱ्यांचा विरोध आहे. प्रशासनाने पाच दिवसांचा आठवडा लागू करण्यापूर्वी त्यातील अटी व शर्थींबाबत सविस्तर चर्चा करून एकमत झाल्यानंतरच पाच दिवसांचा आठवडा लागू करण्याचा निर्णय घ्यावा.तो पर्यंत निर्णय घेऊ नये.असे सांगणारे निवेदन मुंबई महानगरपालिका कामगार कर्मचारी संघटना समन्वय समितीने पालिका आयुक्त प्रविण परदेशी यांना दिले आहे.
सदर निवेदन समितीच्या शिष्टमंडळाने स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांनाही दिले. यावर कामगारांच्या म्हणण्यानुसारच सर्व काही होईल.असे आश्वासन त्यांनी डोक्याचे कामगार नेते बाबा कदम यांनी सांगितले.या शिष्टमंडळात बाबा कदम,सत्यवान जावकर,ऍड. महाबळ शेट्टी, एड.प्रकाश देवदास,बा. शि. साळवी, सुभाष पवार, सूर्यकांत पेडणेकर, के. के. सिंह, साईनाथ राजाध्यक्ष,दिवाकर दळवी आदी होते.
समितीने पुढे म्हटले आहे की, राज्य सरकारने पाच दिवसा आठवडा लागू करताना संबंधित कर्मचान्यांची फक्त ४५ मिनीटे दररोज कामाची वेळ वाढवून त्यांना शनिवारी पूर्ण दिवसाची सुट्टी दिलेली आहे. परंतु वृत्तपत्रात प्रसिद्ध केलेल्या बातमीवरून असे समजते की, महापालिका प्रशासन कर्मचान्यांच्या कामाची वेळ रामारे १.३० तास वाढवणार आहे. तसेच कर्मचाऱ्यांच्या नैमत्तिक रजाही कमी करण्याबाबत प्रशासनाचा विचार असल्याचे समजते. हे अन्यायकारक आहे. महापालिका कामगार कर्मचाऱ्यांना नैमित्तिक रजा मिळतात त्या न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे देण्यात आलेल्या आहेत. त्यामध्ये एकतर्फीपणे प्रशासन बदल करू शकत नाही. महानगरलिका प्रशासनाला कामगार, कर्मचाऱ्यांसाठी जर पाच दिवसांचा आठवडा लागू करावयाचा असल्यास फक्त ४५ मिनिटेच कामाची वाढविण्यात यावी.असे समितीने निवेदनात नमूद केले आहे.तसेच सर्व संवर्गातील कामगार, कर्मचारी, अधिकारी यांना पाच दिवसांचा आठवडा लागू करावा, अशी आमची मागणीही समितीने केली आहे.
रिपोर्टर
Reporter
आदर्श महाराष्ट्र वेब टीम