विक्रोळी (प.) सूर्यनगर विभागातील स्वामी श्री गगनगिरी महाराज सत्संग केंद्राच्या वर्धापनदिनाचे आयोजन!!

 मुंबई : सालाबादप्रमाणे याही वर्षी विश्वगुरु श्री गगनगिरी महाराज यांचे प्रेरणा आशीर्वादाने, तसेच नाथ गगनगिरी श्रमिक सेवा मंडळ (मुंबई) यांचे वतीने स्थापित झालेल्या, सत्संग केंद्र (सूर्यनगर, विक्रोळी) या संस्थेचा १६ वा वर्धापन दिन, येत्या शनिवार दि. ७ मार्च रोजी येथील सूर्यनगर टेकडीवर वसलेल्या गगनगिरी महाराज मंदिरात साजरा करण्यात येणार आहे. 

       यानिमित्ताने श्री गगनगिरी महाराज पादुका पूजन, अभिषेक, भजन, नामस्मरणम होम-हवन, भंडारा आदी धार्मिक विधीबरोबर श्री सत्यनारायण महापूजा व गगनगिरी महाराज प्रतिमा पालखी मिरवणुक आदी धार्मिक कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले आहे.

       विक्रोळी (प.) येथील सूर्यनगर विभागातील नवतरुण चाळ, येथे हा कार्यक्रम संपन्न होणार असून या गगनगिरी उत्सवास, परिसरातील भाविकजनांनी तसेच गगनगिरी भक्तमंडळींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून दर्शन आशीर्वादाचा व तिर्थप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन सूर्यनगर- गगनगिरी सत्संग केंद्राच्या वतीने करण्यात आले आहे

       

 
 


रिपोर्टर

  • Adarsh Maharashtra
    Adarsh Maharashtra

    Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.

    आदर्श महाराष्ट्र वेब टीम

संबंधित पोस्ट