'आवरा रे या महिलांना कोणीतरी', दादरमध्ये क्लीन-अप मार्शलची दहशत

सोमवारीही या महिला मार्शलनी एका कॅन्सर रुग्णाला आणि एक प्रवश्याला अडवलं. त्याने आपण चुकून थुंकलो आहे असं सांगत माफी मागितली. मात्र या मार्शल महिलांनी कोणतीही दयामाया न दाखवता पाचशे रुपये दे असं म्हणत शिवीगाळ सुरू केली.

मुंबई (प्रतिनिधी) : दादर रेल्वे स्टेशनच्या बाहेर बृहन्मुंबई महापालिकेच्या वतीने खासगी कंत्राटदारामार्फत क्लीन-अप मार्शल नेमण्यात आलेले आहेत. मात्र या महिला मार्शलांमार्फत नागरिकांना अर्वाच्य शिवीगाळ करत दादागिरी करत दंड वसूल केला जात आहे. त्यामुळे या स्टेशन परिसरात  येणारे नागरिक आणि प्रवासी हैराण झाले आहेत. या महिला मार्शल आज अर्वाच्य शिवीगाळ करत असताना काही नागरिकांनी रोखण्याचा प्रयत्न केला, मात्र महिला मार्शलकडून दादागिरी सुरू केल्यामुळे नागरिक चांगलेच संतापले आणि गोंधळ सुरू झाला. या महिला मार्शलच्या वतीने नागरिकांची होणारी पिळवणूक थांबवावी अशी मागणी प्रवासी आणि नागरिकांनी केली आहे.

तुम्ही जर दादर स्टेशनच्या बाहेर आलात तर सुरुवातीला तुमच्या कानी एकच आवाज पडतो, तो म्हणजे एका महिलेच्या ओरडण्याचा आणि शिवीगाळ करण्याचा. हा आवाज असतो महापालिकेच्या वतीने खासगी कंत्राटदारामार्फत नेमलेल्या महिला क्लीन-अप मार्शलचा. स्टेशन परिसरामध्ये पान, गुटखा खाऊन थुंकलं की त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी,  त्यांच्याकडून दंड वसूल करण्यासाठी मुंबई महापालिकेने सी .आय. एस. ब्युरोज फॅसिलिटीज सर्विसेस लिमिटेड या कंत्राटदाराला ठेका दिलं आहे. या कंपनीकडून क्लीन-अप मार्शलची नेमणूक करण्यात आलेली आहे.

मात्र एखादा जरा थुंकला की त्याच्या गळपतीला धरुन या महिला मार्शल त्या व्यक्तीला ओढत अर्वाच्च शिवीगाळ करत रस्त्याच्या बाजुला आणतात.  त्यांने दंड द्यायला नकार दिला तर त्याला अर्वाच्य शिवीगाळ करत वेळ प्रसंगी थोबाडीत ही मारतात. एवढ्यावर हे प्रकरण थांबत नसलं आणि तरीही दंड दिला नाही तर अगोदरपासूनच दबा धरून बसलेले तिच्या अन्य सहकारी तिथे येतात आणि या नागरिकांना बाजूला घेऊन मारहाणही करतात. हे प्रकरण दररोज दादर स्टेशनच्या बाहेर सुरू असतं.

सोमवारीही या महिला मार्शलनी एका कॅन्सर रुग्णाला आणि एक प्रवश्याला अडवलं. त्याने आपण चुकून थुंकलो आहे असं सांगत माफी मागितली. मात्र या मार्शल महिलांनी कोणतीही दयामाया न दाखवता पाचशे रुपये दे असं म्हणत शिवीगाळ सुरू केली. शिवीगाळ सुरू होताच इतरही नागरिक त्याठिकाणी जमायला लागले आणि या नागरिकांनी त्या मार्शलची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र या महिला मार्शल ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हत्या. जाब विचारणाऱ्या नागरिकांनाच कपडे काढून मारेन अशी धमकीही या बाईने द्यायला सुरुवात केली. त्यामुळे इथले नागरिक चांगलेच संतापले. नागरिक जमा होत असल्याचे लक्षात येताच या महिला मार्शल नी सर्वांनाच धमकावले,  तुम्हाला पोलिसांच्या स्वाधीन करतो अशी धमकी द्यायला सुरुवात केली. यावेळी नागरिकांनी या मार्शलला पोलीस स्टेशनकडे नेलं आणि तिच्या विरोधामध्ये तक्रार दाखल केली. पोलीस स्टेशनमध्ये जरी तक्रार दाखल झाली असली तरीही या महिला मार्शल यांच्या जोरावर दादागिरी करत आहेत. त्या कंत्राटदाराला ही ताब्यात घेऊन त्याच्यावर कारवाई करावी अशी मागणी आता नागरिकांकडून होत आहे.

रिपोर्टर

  • Adarsh Maharashtra
    Adarsh Maharashtra

    Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.

    आदर्श महाराष्ट्र वेब टीम

संबंधित पोस्ट