आझाद मैदानात आंदोलन करणाऱ्या मराठा समाजातील तरुणांची नियुक्ती नाहीच
मराठा आरक्षणाचा विषय सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असल्याने सध्या मराठा तरुणांची नियुक्ती करता येणार नाही
- by Adarsh Maharashtra
- Mar 03, 2020
- 514 views
मुंबई(प्रतिनिधी) : सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणाचा विषय अद्यापही प्रलंबित आहे. सर्वोच्च न्यायालयातून जोपर्यंत आदेश येत नाही तोपर्यंत तरुणांच्या नियुक्तीचा निर्णय घेता येणार नाही, असं महत्त्वपूर्ण विधान बहुजन कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार यांनी विधान परिषदेत केलं आहे. गेल्या ३६ दिवसांपासून मुंबईतील आझाद मैदानात मराठा समाजाच्या तरुणांचं आंदोलन सुरु आहे.
भाजप आमदार भाई गिरकर यांनी मराठा आरक्षणासाठी तरुणांनी पुकारलेल्या आंदोलनाचा प्रश्न सभागृहात उपस्थित केला होता. त्यावर वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया देताना हे विधान केलं आहे. त्यांनी सांगितल्याप्रमाणे, मराठा आंदोलनाचा विषय़ सध्या सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. जोपर्यंत सर्वोच्च न्यायालयाकडून त्या संदर्भात आदेश येत नाही तोपर्यंत तरुणांच्या नियुक्तीचा निर्णय़ घेता येणार नाही. मराठा समाजातील तरुण राज्य शासनाच्या वेगवेगळ्या ५६ हून अधिक रिक्त जागांवर नियुक्ती करावी यासाठी मुंबईच्या आझाद मैदानावर आंदोलन करत आहेत. मराठा समाजाला महाराष्ट्र अधिनियम क्र. ६२ मधील कलम १८ अन्वये काढण्यात आलेल्या शासन निर्णयाची अंमलबजावणी करून २०१४ सालच्या भरती प्रक्रियेतील उमेदवारांची तत्काळ नियुक्ती करावी यासाठी आंदोलन सुरु आहे. गेल्या ३६ दिवसांपासून हे तरुण आझाद मैदानात आंदोलन करीत आहेत.
काही दिवसांपूर्वी खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी आज आंदोलकांची भेट घेतली होती. हे सरकार अधिकारी चालवतात की मुख्यमंत्री चालवतात हा प्रश्न पडला आहे, अशी टीका त्यांनी केली होती. या मराठा तरुणांना न्याय मिळत नसेल तर रस्त्यावर उतरण्याशिवाय पर्याय नाही असा इशारा त्यांनी दिला होता. मराठा समाजाला बाजूला ठेवू नका. ३५ दिवस आंदोलन करुनही का पर्याय निघाला नाही, सरकार हे मुख्यमंत्र्यांनी चालवायचं असतं अधिकाऱ्यांनी नाही. अधिकाऱ्यांच्या बाबूगिरीमुळे साडेतीन हजार तरुणांचं भवितव्य धोक्यात आल्याचं ते यावेळी म्हणाले होते.
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम