ऑफिस मधून वेळेत निघा, आज रात्री 4 तासाचा विशेष मेगाब्लॉक

ऑफिसमधून रात्री उशिरा घरी निघणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी

मुंबई (प्रतिनिधी) : ऑफिसवरून रात्री उशिरा सुटणाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. मध्य रेल्वे मार्गावर आज ४  तासांचा विशेष मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. विद्याविहार रेल्वे स्थानकातील जुना पूल पाडण्यासाठी हा ब्लॉक असल्याचं मध्य रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे. १२ ते सकाळी ४ वाजेपर्यंत पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेवरुन हा ब्लॉक घेण्यात येणार आहे. शुक्रवार-शनिवार मुलुंड ते माटुंगा स्थानकादरम्यान रात्रकालीन विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे लोकमान्य टर्मिन्सहून सुटणाऱ्या काही लांब पल्ल्यांच्या गाड्यांच्या वेळेत बदल करण्यात आले आहेत.

लोकमान्य टिळक टर्मिनन्स-भुवनेश्वर एक्स्प्रेस १२.१५ ऐवजी सकाळी ४.३०  वाजता सुटेल, तर लोकमान्य टिळक टर्मिनन्स-मांडुवाडीह एक्स्प्रेस मध्यरात्री १२.३५ ऐवजी पहाटे ५ वाजता सुटणार आहे. लोकमान्य टिळक टर्मिनन्स- मडगाव डबल डेकर रात्री १.१० ऐवजी ५.१० वाजता सुटणार असल्याची माहिती मध्य रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

मुलुंड ते माटुंगा स्थानकादरम्यान पाचव्या आणि सहाव्या ट्रॅकवर हा ब्लॉक घेण्यात येणार आहे. विद्याविहार स्थानकातील जुन्य़ा पदचारी पूल पाडण्याचं काम या वेळेत केलं जाणार आहे. त्यामुळे यावेळा लोकल सेवा या दोन्ही ट्रॅकवरून बंद राहणार असून लांब पल्ल्यांच्या गाड्या रिशेड्युल करण्यात आल्या आहेत.



                                                                                  

रिपोर्टर

संबंधित पोस्ट