बहिणीच्या न जन्मलेल्या बाळाची हत्या; तरुणाला साडेतीन वर्षाची शिक्षा

सेशन्स कोर्टाने हत्येच्या एका प्रकरणात ऐतिहासिक निकाल दिला आहे. गर्भवती बहिणीच्या पोटात लाथ मारल्याने तिच्या पोटातील बाळाचा मृत्यू झाल्याप्रकरणी सेशन्स कोर्टाने आरोपीला साडेतीन वर्षाची शिक्षा सुनावली आहे.

मुंबई.(प्रतिनिधी) : सेशन्स कोर्टाने हत्येच्या एका प्रकरणात ऐतिहासिक निकाल दिला आहे. गर्भवती बहिणीच्या पोटात लाथ मारल्याने तिच्या पोटातील बाळाचा मृत्यू झाल्याप्रकरणी सेशन्स कोर्टाने आरोपीला साडेतीन वर्षाची शिक्षा सुनावली आहे.
मनोज कराखे असं या तरुणाचं नाव आहे. भादंविच्या कलम ३१६ अन्वये त्याला दोषी ठरवण्यात आलं असून त्याला साडेतीन वर्षाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. या कलमान्वये १० वर्षांच्या शिक्षेची तरतूद आहे. त्याच्यावर इतरही कलमांखाली गुन्हे नोंदवण्यात आले होते. या आरोपीविरोधात पीडित तरुणी, आई, बहीण आणि बहिणीच्या नवऱ्याने साक्ष दिली होती, असं सरकारी वकील प्रांजली जोशी यांनी सांगितलं. मनोजची बहीण पतीसोबत राहत होती. तर तो शेजारी राहत होता.                                                                                                                                                                                                                                                                                                                                                  २०१७मध्ये ही घटना घडली होती. १६ ऑक्टोबर २०१७मध्ये मनोजची बहीण चार महिन्याची गर्भवती होती. त्या दिवशी सकाळी १० वाजेच्या सुमारास मनोज आणि दुसऱ्या बहिणीचं कडाक्याचं भांडण झालं होतं. मी हे भांडण सोडवायला गेले होते. तेव्हा त्याने मला शिवीगाळ केली आणि माझ्या पोटात चार महिन्याचा गर्भ असल्याचं माहीत असूनही माझ्या पोटावर लाथ मारली. त्यामुळे मी बेशुद्ध पडून जमिनीवर कोसळले. या प्रकारामुळे मला तात्काळ दवाखान्यात नेण्यात आले. सोनोग्राफी केली असता माझ्या पोटातील बाळ दगावल्याचं सांगण्यात आलं आणि मला गर्भपात करावा लागला, असं पीडित महिलेने सांगितलं. या घटनेनंतर मनोजविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आणि त्यामुळे त्याला पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर हे प्रकरण कोर्टात गेलं. त्याचा मंगळवारी अखेर निकाल आला.           

रिपोर्टर

संबंधित पोस्ट