धक्कादायक; ज्यांना मदत मागितली त्यांच्याकडूनच बलात्कार
नवी मुंबईत एक अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. ज्यांच्याकडे ज्यांच्याकडे मदतीची याचना केली त्यांनीच एका १९ वर्षीय तरुणीवर बलात्कार केला. लज्जास्पद बाब म्हणजे दोन तासांच्या अंतराने तीन लोकांनी या तरुणीवर आळीपाळीने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. रबाळे पोलिसांनी या तिन्ही नराधमांना अटक केली असून अधिक तपास करत आहेत.
- by Sanjay Pachouriya
- Feb 26, 2020
- 2110 views
नवी मुंबई : नवी मुंबईत एक अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. ज्यांच्याकडे ज्यांच्याकडे मदतीची याचना केली त्यांनीच एका १९ वर्षीय तरुणीवर बलात्कार केला. लज्जास्पद बाब म्हणजे दोन तासांच्या अंतराने तीन लोकांनी या तरुणीवर आळीपाळीने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. रबाळे पोलिसांनी या तिन्ही नराधमांना अटक केली असून अधिक तपास करत आहेत.
१८ फेब्रुवारी रोजी ही धक्कादायक घटना घडली. या तरुणीला घाटकोपरहून ट्रेन पकडायची होती. मात्र ती ट्रेन पकडू शकली नाही. त्यानंतर दुसरी लोकल पकडून ही तरुणी मुंब्रा स्टेशनवर पोहोचली आणि रात्री स्टेशनवरच झोपली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी ट्रेन पकडून ती दिवा स्थानकात पोहोचली. मात्र तिच्याकडे पैशाची कमतरता असल्याने तिने एका महिलेच्या मदतीने नाकातली नथ विकण्याचा प्रयत्न केला. मात्र संध्याकाळपर्यंत नथ विकल्या गेली नाही. त्यानंतर संध्याकाळी साडे आठ वाजेच्या सुमारास तिने एका हॉटेलजवळून रिक्षा पकडली आणि स्टेशनकडे जायला निघाली. मात्र रिक्षा चालकाने ही रिक्षा महापे येथील एका जर्जर इमारतीत रिक्षा नेली आणि तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर तो तिला एका मंदिराजवळ सोडून पळून गेल्याचं पोलिसांनी सांगितलं.
त्यानंतर तिने रात्री १० वाजता स्कूटरवरून जाणाऱ्या दोन लोकांकडे मदत मागितली. या दोन तरुणांनी तिला स्कूटरवर बसवले आणि घणसोलीला नेऊन तिच्यावर बलात्कार केला. याप्रकरणी २३ फेब्रुवारी रोजी गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींना अटक करण्यात आली आहे. या तिन्ही नराधमांची २९ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.
रिपोर्टर
Reporter
आदर्श महाराष्ट्र वेब टीम