टीएमटीची वाहतूक चौकी, बस स्टॉप तोडला, मुंबई पालिकाेच्या अतिक्रमणविरोधी पथकाची कारवाई

मुलुंड स्टेशनबाहेरील ठाणे परिवहन विभागाच्या वाहतूक चौकीसह बस स्टॉप मुंबई पालिकेच्या अतिक्रमण विभागानं तोडून टाकलाय.

मुंबई (प्रतिनिधी) :मुलुंड स्टेशनबाहेरील ठाणे परिवहन विभागाच्या वाहतूक चौकीसह बस स्टॉप मुंबई पालिकेच्या अतिक्रमण विभागानं तोडून टाकलाय. बस स्टॉप आणि वाहतूक चौकी अनधिकृत असून तिथे असलेले फूटपाथ पुन्हा बांधायचे असल्याचे कारण अतिक्रमण विरोधी पथकानं दिलंय. मुलुंड स्टेशन पश्चिम येथून टीएमटी बसेसचे दिवसाला २५० ते ३०० फेऱ्या होतात. यातून प्रवासी संख्या २ ते अडीच लाख इतकी आहे. आता हे बस स्टॉप तोडल्याने प्रवाशांना उन्हात उभे राहून बसची वाट बघावी लागत आहे.

रिपोर्टर

संबंधित पोस्ट