६२ वर्षीय वॉचमनचा मुलीवर बलात्कार, पीडिता गरोदर झाल्यानंतर समोर आला धक्कादायक प्रकार

डोंबिवली पूर्वेतील सुनील नगर परिसरात एका सोसायटीत ही घटना घडली आहे.

डोंबिवली (प्रतिनिधी): वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी नराधम 62 वर्षीय वॉचमनला रामनगर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. पीडिता गरोदर झाल्याने हा घृणास्पद प्रकार समोर आला आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, डोंबिवलीत एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या नाराधामला रामनगर पोलिसांनी अटक केली आहे. डोंबिवली पूर्वेतील सुनील नगर परिसरात एका सोसायटीत ही घटना घडली आहे. उत्तम निकाळजे असे आरोपीचे नाव आहे. सोसायटीतील एका अल्पवयीन मुलीला चॉकलेट आणि पैसे देऊन तिच्यावर तो वयाच्या ११ व्या वर्षापासून बलात्कार करत होता. पीडित मुलगी गरोदर झाल्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघड झाला. या प्रकरणी नराधम उत्तम निकाळजे याला पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीला कल्याण कोर्टात हजर केले असता त्याला २ दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

कल्याण- डोंबिवलीत वाढली गुन्हेगारी

कल्याण- डोंबिवलीत गुन्हेगारीच्या घटना वाढल्या आहेत. त्यात बलात्काराच्या घटना गेल्या वर्षाच्या तुलनेत तीनने वाढ झाली आहे. यामुळे पोलिसांसमोर गुन्ह्याला आळा घालण्याचे आव्हान उभे राहिले आहे. गेल्या काही वर्षांपासून गुन्हेगारीचे प्रमाण सातत्याने वाढत आहे. अनेक गुन्हेगारी टोळ्या सक्रिय झाल्या आहेत. त्यात कल्याण परिमंडळ ३ अंतर्गत आठ पोलिस स्टेशन आहेत. या परिसरातील कायदा आणि सुव्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न सुरू केले आहेत. वाढती लोकसंख्या आणि अपुरे मनुष्यबळ, साधनसामग्रीची कमतरता आदी समस्यांचा सामना पोलिसांना करावा लागतो.

कल्याण परिमंडळात विनयभंगाच्या घटना कमी झाल्या असल्या तरी बलात्काराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. २०१८ मध्ये ७४ बलात्काराच्या घटना घडल्या होत्या. त्यात २०१९ मध्ये ५ ने वाढ झाली होती.


रिपोर्टर

संबंधित पोस्ट