
माटुंगा रेल्वे स्टेशनवर छेडछाड, तरुणाने जबरदस्तीने केलं तरुणीला Kiss
या प्रकरणी तपास सुरु असताना पोलिसांनी एका पाकिटमाराला अटक केली होती. त्यावेळी त्यानेच हा गुन्हा केल्याचं कबुल केलंय.
- by Reporter
- Feb 07, 2020
- 918 views
मुंबई.(प्रतिनिधी):राज्यात तरुणींच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला असतानाच मुंबईतल्या लोकल रेल्वे स्टेशनवरचा एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. एका मुलीची छेड काढल्याचं CCTVत पुढे आलंय. त्यामुळे मुलींच्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित झालाय. मुंबईच्या रेल्वे स्टेशनवर लाखोंची वर्दळ असते. त्यात मुलीही रात्री प्रवास करत असतात त्यामुळे या मवाली तरुणांचा कसा बंदोबस्त करायचा असा प्रश्न पोलिसांसमोर निर्माण झालाय. मुंबईतलं सर्वाधिक वर्दळीचं स्टेशन असलेल्या दादर जवळच्या माटुंगा रेल्वे स्थानकावरची ही घटना आहे.
मुंबईतील माटुंगा रेल्वेस्थानाकात एका युवतीचा विनयभंग करून तिच्या गालावर बळजबरी चुंबन घेणाऱ्या आरोपीला जीआरपी पोलिसांनी अटक केली आहे.२५ जानेवारीची ही घटना असून माटुंगा रेल्वेस्थानकावर एक तरुणी पुलाच्या पायऱ्या चढून जात असताना तिचा पाठलाग करीत असलेल्या एका युवकाने जवळ येऊन त्या युवतीला काही कळायच्या अगोदरच तिच्या अंगाला स्पर्श करीत तिच्या गालावर चुंबन घेण्याचा प्रयत्न केला. सदर तरुणीने ह्या प्रकाराला विरोध करताच हा आरोपी जागेवरून तात्काळ पळून गेला.
हा सगळा प्रकार माटुंगा रेल्वे स्थानकावरील सीसीटीत कैद झाला असता याचा तपास पोलिसांनी सुरू केला होता. मात्र या संदर्भात पोलिसांकडे सदर या तरुणीकडुन कुठलीही तक्रार करण्यात आलेली नव्हती. जीआरपी पोलिसांनी रेल्वे हद्दीत लोकल ट्रेन मध्ये पाकिटमारी करण्याऱ्या आरोपींच्या विरोधात मोहीम सुरू केली होती ज्यात पाकिटमारी च्या गुन्ह्यात पोलिसांनी राजीजूर हबीब्युर खान या आरोपीला अटक केली असता ह्याच आरोपीने पीडित युवतीचा विनयभंग केल्याचे समोर आले आहे.
पोलिसांनी तुर्तास या आरोपीला चोरीच्या गुन्ह्यात अटक केली आहे मात्र विनयभंगाचा गुन्हा अद्याप दाखल केलेला नाही. पीडित युवतीने स्वतःहून या संदर्भात पुढे येऊन तक्रार करावी असे आव्हाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे.
रिपोर्टर