
डोंबिवलीत सुटकेसमधील मृतदेह प्रकरणाचा लागला छडा, सेक्सला नकार दिल्याने मित्राने केली मित्राची हत्या
आज सकाळी एका ५३ वर्षीय व्यक्तीचा मृतदेह डोंबिवली पश्चिमेतील बागशाळा मैदानाशेजारी असलेल्या झुडूपात आढळून आल्यामुळे खळबळ उडाली होती.
- by Reporter
- Feb 07, 2020
- 1978 views
डोंबिवली.(प्रतिनिधी): डोंबिवलीमध्ये एका व्यक्तीचा मृतदेह सुटकेसमध्ये सापडल्यामुळे खळबळ उडाली होती. मात्र, डोंबिवली पोलिसांनी अवघ्या 9 तासात या प्रकरणाचा चढा लावला आहे. पुरुषाने शरीर संबंध ठेवण्यास नकार दिलाने हत्या केल्याचं समोर आलं आहे.
आज सकाळी डोंबिवली पश्चिमेतील बागशाळा मैदानाशेजारी असलेल्या झुडूपात एका ५३ वर्षीय व्यक्तीचा सुटकेसमध्ये मृतदेह सापडला होता. पोलिसांनी या मृतदेहाबाबत अधिक तपास केला असता मृत व्यक्ती ही उमेश पाटील असल्याची ओळख पटली. ओळख पटताच ठाणे पोलिसांनी केलेल्या तपासात डोंबिवली येथे राहणारा प्रफुल्ल पवार या २७ वर्षीय तरुणाला ठाणे पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाने अटक केली आणि हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.
आरोपी प्रफुल्ल पवार आणि उमेश पाटील यांची ६ महिन्यांपूर्वी रेल्वेत प्रवासा दरम्यान ओळख झाली होती. या ओळखी नंतर दोघांचे शारीरिक संबंध जुळले अनेक महिने हे शारिरीक संबंध सुरुच होते काही दिवसांपूर्वीच आरोपी प्रफुल्ल पवार याचे लग्न झाले त्यानंतर प्रफुल्ल ने उमेश पाटील यांच्याशी शारिरीक संबंध ठेवण्यास नकार दिला ज्यामुळे प्रफुल्ल आणि उमेश यांच्यात वाद होऊ लागले. बुधवारी रात्री प्रफुल्ल आणि उमेश यांच्यात जोरदार भांडण झाले ही भांडणे मारहाणीपर्यंत गेले. ज्यात प्रफुल्लने उमेश पाटील यांची गळा दाबून हत्या केली आणि पुरावा नष्ट करण्याकरता प्रफुल्लने उमेशचा मृतदेह बॅगेत भरुन डोंबिवली पश्चिमेतील बाग शाळा मैदाना जवळील झुडूपात टाकला होता.
अटक केल्यानंतर प्रफुल्ल पवारने हा सगळा प्रकार पोलिसांना सांगितला. पोलिसांनी अवघ्या 9 तासांमध्ये आरोपीला अटक करून प्रकरणाचा छडा लावला. दरम्यान, डिसेंबर २०१९ महिन्यातही माहिम बीचवर सुटकेसमध्ये मृतदेह आढळला होता. माहिम सूटकेस हत्याकांडात मुंबई क्राईम ब्रांचने एक धक्कादायक खुलासा केला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ५९ वर्षीय बेनेट रिबेलो यांच्या हत्येमधील मुख्य आरोपी म्हणजे त्यांची मुलगी ही अल्पवयीन होती. तिचं वय १९ वर्ष असल्याचं सांगण्यात येत होतं पण ते ती १९ नसून अवघ्या १७ वर्षांची असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं होतं.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तिच्या जन्म प्रमाणपत्र आणि आधार कार्डनुसार २१ जुलै २००२ रोजी तिचा जन्म झाला होता. त्यानुसार तिचे वय १७ वर्षे सहा महिने होते. रविवारी स्थानिक कोर्टाने पोलिसांना ते जुवेनाइल न्याय मंडळासमोर हजर करण्यास सांगितलं. तिचे वय निश्चित करण्यासाठी तिचे वैद्यकीय तपासणी करण्याचा विचार पोलीस करीत होते.
मयत व्यक्तीच्या दत्तक मुलीला तिच्या अल्पवयीन प्रियकराच्या मदतीने हे धक्कादायक कृत्य केल्याचे समोर आले होते. प्रेमात अडथळा ठरल्याने मुलीने बापाचा काटा काढला. एवढेच नाही तर गुप्तांगासह अवयव कापून ते सुटकेसमध्ये भरून मिठी नदीत फेकल्याचे आरोपींनी कबूल केले होते. पोलिसांनी फेसबुक प्रोफाइल वरून मयत व्यक्तीची ओळख पटवली होती.
रिपोर्टर