
समाजाने बहिष्कृत केल्याने जळगावात तरुणीची आत्महत्या
देशात कायदे करूनही समाजातली बुरसटलेली विचारसरणी ७१ व्या प्रजासत्ताकदिनाच्या उंबरठ्यावर अजूनही घट्टपणे रुजलेली असल्याचे धक्कादायक वास्तव जळगावात समोर आले आहे. कंजरभाट समाजात स्वीकारण्यास आजोबा व जातपंचायतीने नकार दिल्याने एका तरुणीने गुरुवारी (ता. २३) आत्महत्या केली.
- by Reporter
- Jan 31, 2020
- 680 views
जळगाव (प्रतिनिधी): देशात कायदे करूनही समाजातली बुरसटलेली विचारसरणी ७१ व्या प्रजासत्ताकदिनाच्या उंबरठ्यावर अजूनही घट्टपणे रुजलेली असल्याचे धक्कादायक वास्तव जळगावात समोर आले आहे. कंजरभाट समाजात स्वीकारण्यास आजोबा व जातपंचायतीने नकार दिल्याने एका तरुणीने गुरुवारी (ता. २३) आत्महत्या केली. तब्बल बारा तास तिचा मृतदेह घरातच पडून होता. अखेर खडबडून जागे झालेल्या जातपंचायतीने तिच्या मृत्यूनंतर तिला समाजात घेतले आणि नंतर समाजाच्या पद्धतीने तिच्यावर अग्निसंस्कार करीत पापक्षालनाचा प्रयत्न केला. या एकूणच चीड आणणाऱ्या प्रकाराने संताप व्यक्त होत आहे.
जळगावातील सिंगापूर कंजरवाडा भागात ही धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. आजोबांसह जातपंचायतीने नकार दिल्याने हतबल झालेल्या तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा आरोप मुंबई येथील शासकीय अधिकारी कृष्णा इंद्रेकर यांनी पत्रकाद्वारे केला आहे. मानसी उर्फ मुस्कान आनंद बागडे (वय १९) असे या तरुणीचे नाव असून, तिने गुरुवारी (दि. २३) दुपारी बारा वाजता सिंगापूर कंजरवाडा भागात आत्महत्या केल
कृष्णा इंदेकर यांनी 'मटा'ला दिलेल्या माहितीनुसार, मानसीचे वडील कंजरभाट समाजाचे आहेत. ते महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीत नोकरीला आहेत. त्यांनी १५ वर्षांपूर्वी दुसऱ्या धर्माच्या महिलेशी प्रेमविवाह केला होता. या महिलेपासून मानसीसह दोन मुली आहेत. मात्र, मानसीच्या आजोबांना हा प्रेमविवाह मान्य नव्हता. त्यांनी मानसीच्या वडिलांचा प्रेमविवाह झालेला असतानाही कंजरभाट समाजातील महिलेशी लग्न लावून दिले होते. तेव्हापासून मानसीचे वडील समाजातील पत्नीसोबत राहत होते. मानसीची आई दोन्ही मुलींसोबत जळगाव शहरातील कंजरवाड्यात विभक्त राहत होती.
मानसीचे लग्नाचे वय झाले होते. त्यामुळे तिचे आपल्याच समाजातील मुलाशी लग्न व्हावे, म्हणून तिच्या काकांनी पुढाकार घेतला. तिच्यासाठी कोल्हापूरचे स्थळही आले होते. मात्र, तिच्या आजोबांसह जातपंचायतीने तिला 'जातगंगा' देऊन समाजात घेण्यास विरोध केला. विनवण्या करूनही आजोबांनी आपली भूमिका बदलली नाही. शेवटी मानसीने हतबल होऊन गुरुवारी दुपारी बाराच्या सुमारास राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे इंद्रेकर यांनी सांगितले.
बारा तास तरुणीचा मृतदेह घरातच
मानसीच्या आत्महत्या केल्यानंतर तिचा मृतदेह बारा तास घरातच ठेवत हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न संबंधितांनी केला. तिच्या आईने पोलिसात तक्रार करू नये म्हणून दबावदेखील टाकण्यात येत होता. मात्र, औद्योगिक वसाहत पोलिसांना तरुणीच्या आत्महत्येची माहिती मिळाल्यावर त्यांनी मृतदेह विच्छेदनासाठी ताब्यात घेतला. त्यानंतर हा प्रकार समोर आला. मात्र, तरीही तरुणीचे कुटुंबीय या प्रकरणी स्पष्ट माहिती देण्यास टाळाटाळ करत आहेत.
मृत्यूनंतर घेतले जातीत!
वडील म्हणतात, तापामुळे मृत्यू!
तो तिच्या आजोबांचा विरोध!
रिपोर्टर