वसईत भरधाव ट्रकने पाच जणांना चिरडलं, एकाचा मृत्यू
ट्रक चालकाचे स्टेअरिंगवरील नियंत्रण सुटले व रस्त्याच्याकडेला झोपलेले लोक ट्रक खाली आले.
- by Reporter
- Jan 28, 2020
- 1054 views
मुंबई(प्रतिनिधी):भरधाव वेगात पळणाऱ्या ट्रकने रस्त्यावर झोपलेल्या पाच जणांना चिरडल्याची घटना वसईमध्ये घडली आहे. यामध्ये एकाचा मृत्यू झाला असून, चार जण जखमी झाले आहेत. सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास हा अपघात घडला.
सोमवारी रात्री ११.३० च्या सुमारास ट्रक चालकाचे स्टेअरिंगवरील नियंत्रण सुटले व रस्त्याच्याकडेला झोपलेले लोक ट्रक खाली आले. यात एकाचा मृत्यू झाला असून, चारजण जखमी झाले आहेत.
अपघाताच्यावेळी ट्रक चालक मद्याच्या अंमलाखाली होता. स्थानिकांनी त्याला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. जखमींना नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

रिपोर्टर