नशिबच फुटकं! ATM लुटतानाच लागली आग, धूम ठोकून पळाले चोरटे

तयारी करून लुटायला गेले एटीएम आणि लागली आग, पाहा काय झाली ATM मशीनची हालत.

पिंपरी चिंचवड.(प्रतिनिधी): एटीएम आल्यापासून लोकांना झटपट आणि गरजेनुसार पैसे काढता येतात. याच कारणामुळे सध्या गावोगावी आणि प्रत्येक चौकात एटीएम दिसतात. मात्र यामुळेच चोरट्यांचा डोळाही एटीएमवर असतो. त्यामुळं एटीएम लुटणाऱ्यांच्या संख्येतही दिवसेंदिवस वाढ होत आहे. मात्र पिंपरी चिंचवडमध्ये एक भयंकर प्रकार घडला. पिंपरी चिंचवड मधील ATM मशिन्स फोडण्याच्या घटना काहीं केल्या थांबताना दिसत नाही आहे. शुक्रवारी रात्री पुन्हा या शहरातील एका ATM वर चोरट्यांनी डल्ला मारत तब्बल 8 लाख रुपय लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे.

धक्कादायक बाब म्हणजे गॅस कटरच्या साह्याने ATM कापल्या नंतर लागलेल्या आगीत ATM मशीन पूर्णपणे जळून खाक झाली आहे . मागील 3 महिन्यांपासून पिंपरी शहरातील वेगवगेळ्या भागातील ATM मशिन्स फोडून रोकड चोरल्याच्या घटना घडल्यायत ,अशा घटना वारंवार घडत असल्याने पिंपरी चिंचवड चे पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई ह्यांनी शहरातील ATM च्या सुरक्षेसाठी विशेष पथक तैनात केलं होतं ,मात्र पोलिसांची भीती न बाळगता चोरटे त्यांचं काम बिनधास्तपणे करतांना दिसत आहे. मुख्य म्हणजे ही घटना तर वाकड पोलीस स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर असलेल्या दत्तमंदिर रोडवरील ऍक्सिस बँकेच्या ATM मशीन फोडताना घडली.


ATM मशीन फोडण्यासाठी आलेल्या तरुणांनी सगळ्यातआधी ATM कॅबिनमधील CCTV कॅमेरा निकामी करण्याचा प्रयत्न केल्याची ही दृश्य cctv कैद झाली असून त्या आधारावर वाकड पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. पिंपरीतील वाकड पोलीस स्थानकाजवळच अज्ञातांनी एटीएम फोडण्याचा प्रयत्न केला. मात्र एटीएम लुटत असताना एक भयंकर प्रकार घडला. AXIS बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न चोरटे करत असतानाच एटीएम मशीनला अचानक आग लागली.

संबंधित पोस्ट