
मुंबईत महिलेवर सामूहिक बलात्कार, ४ अटकेत
मध्य प्रदेशातील आपल्या घराकडे निघालेल्या एका प्रवासी महिलेवर मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनसजवळ सामूहिक बलात्कार झाल्याची घटना उघड झाली आहे. ही घटना काल रात्री घडली. या प्रकरणातील ४ आरोपींना पोलिसांनी अटक केली असून पोलीस त्याची चौकशी करत आहेत.
- by Sanjay Pachouriya
- Jan 21, 2020
- 738 views
मुंबई(प्रतिनिधी):मध्य प्रदेशातील आपल्या घराकडे निघालेल्या एका प्रवासी महिलेवर मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनसजवळसामूहिक बलात्कार झाल्याची घटना उघड झाली आहे. ही घटना काल रात्री ११ च्या सुमारास घडली. या प्रकरणातील ४ आरोपींना नेहरु नगर पोलिसांनी अटक केली असून पोलीस त्याची चौकशी करत आहेत. रात्री घडलेल्या या सामूहिक बलात्काराच्या घटनेमुळे लोकमान्य टिळक टर्मिनस परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. सोनू तिवारी, निलेश बारसकर, सिद्धार्थ वाघ आणि श्रीकांत भोगले अशी आरोपींची नावे आहेत.
पीडित महिला रात्री ११ च्या सुमारास कुर्ला रेल्वे स्थानकाहून लोकमान्य टिळक टर्मिनसकडे पायी निघाली होती. दरम्यान ती साबळे नगर येथील झाडीमध्ये लघुशंकेसाठी गेली. त्यावेळी आरोपी सोनू तिवारी आणि निलेश बारसकर हे झाडीच्या पलिकडे होते. लघुशंकेला बसत असलेल्या महिलेला आरोपींनी ओढून झाडीत नेत तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. दरम्यानच्या काळात दुसरे दोघे आरोपी सिद्धार्थ वाघ आणि श्रीकांत भोगले हे दुचाकीवरून जात होते. आरडा ओरडा ऐकून त्यांनी पीडित महिलेला मदत करण्याऐवजी तिचे अनैसर्गिक लैंगिक शोषण केले. तसेच या पीडित महिलेचे मंगळसूत्र आणि रोख ३००० रुपये घेऊनही आरोपी पळून गेले. हे पाहून एका महिलेने पोलिसांना १०० क्रमांकावर फोन करून बोलावले. तातडीने दाखल होत पोलिसांनी आरोपींच्या मुसक्या आवळल्या.
रिपोर्टर
Reporter
आदर्श महाराष्ट्र वेब टीम