
चोरीच्या घटना रोखण्यासाठीलॉन्समध्ये उपाययोजना करा
लॉन्स चालक-मालकांना पोलिसांची सूचना
- by Reporter
- Jan 21, 2020
- 1091 views
पंचवटी: लॉन्स व मंगल कार्यालयात अलीकडे वाढलेल्या चोरी, चेन स्नॅचिंगच्या घटना रोखण्यासाठी सुरक्षारक्षक, सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, तसेच वाहतुकीला अडथळा ठरणार नाही, यासाठी पार्किंगची सुविधा करण्याची सूचना पोलिस उपायुक्त अमोल तांबे यांनी आडगाव पोलिस स्टेशनच्या हद्दीतील लॉन्स व मंगल कार्यालयांच्या चालक-मालक व व्यवस्थापकांना केल्या.
लग्न समारंभप्रसंगी चेन स्नॅचिंग, बतावणी व पिक पॉकेटिंग होऊन अनुचित घटना घडू नये यासाठी उपाययोजना म्हणून सोमवारी (दि. २०) आडगाव पोलिस स्टेशनमध्ये लॉन्स चालक-मालक व व्यवस्थापक यांच्या बैठकीचे आयोजन केले होते. बैठकीत पोलिस उपायुक्त अमोल तांबे यांनी मार्गदर्शन केले.
लॉन्समध्ये लग्न समारंभास येणारी वाहने रस्त्यावर उभी करून वाहतुकीस अडथळा निर्माण केला जातो. लॉन्सबाहेर वाहने उभी न करता ती सुयोग्य रीतीने पार्क करावीत. तसेच चोरीच्या घटनांवर आळा बसावा, याकरिता सर्व लॉन्सचालकांनी प्रवेशद्वाराच्या आत व बाहेर तत्काळ उच्चप्रतीचे सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत. लग्न समारंभात कोणत्याही परिस्थितीत डीजे लावण्यावर परवानगी देण्यात येणार नाही. सायंकाळच्या लग्न समारंभात लॉन्सबाहेर उच्च प्रतीचे दिवे लावावीत. याचबरोबर लॉन्सच्या आतील सुरक्षेसाठी सुरक्षारक्षक नेमण्यात यावेत. या बैठकीस ३८ लॉन्सचे चालक-मालक व व्यवस्थापक उपस्थित होते. आडगाव पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल पाटील यांनी या बैठकीचे सूत्रसंचालन केले.
रिपोर्टर