मुंबईतल्या 'नाईट लाइफ'च्या मुद्यावर काय म्हणाल्या महापौर किशोरी पेडणेकर?

मुंबईत नाईटलाइफ सुरू करण्याचं पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी मनावर घेतल्यापासून नाईटलाइफ रोजगार भरती साठी किती उपयुक्त ठरणार आह

मुंबई(प्रतिनिधी): पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी नाईट लाईटचा मुंबई महापालिकेत मंजूर केलेला प्रस्ताव राबवणार असल्याचे संकेत दिल्यानंतर सर्वत्र या मुद्द्यावरून चर्चा सुरू झाली आहे. मुंबईतल्या काही मोजक्याच भागांमध्ये हा प्रयोग करून पाहिला जाईल, असं सांगण्यात येत आहे. त्यातच हा प्रस्ताव कशा पद्धतीने रोजगार निर्मितीला उपयुक्त ठरेल याचा पाढाच वाचला जातोय.

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी सुद्धा रोजगार निर्मितीसाठी नाईट लाईफ चांगली ठरेल, असं म्हटलं आहे. इतकंच नाही तर पोलिस यंत्रणेवर ताण येईल, याबाबत प्रश्न विचारला असता नाईट लाईफ बॉय पोलीस भरती ही वाढेल. म्हणजेच रोजगार वाढेल, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.

मुंबईत बाहेरून येणाऱ्या पर्यटकांना स्वस्तात जेवण उपलब्ध करून देण्यासाठी रेस्टॉरंट सुरू ठेवण्याचे संकेत पर्यटनमंत्र्यांनी दिले होते. परंतु हा मुद्दा इतकाच मर्यादित न राहता सुरक्षा स्वच्छता या बाबीही संबंधित आहे. त्यामुळे गृहमंत्र्यांनी मात्र इतक्या लगेच हा प्रस्ताव लागू करणे कठीण असल्याचं म्हटलं होतं. पण महापौरांच्या म्हणण्याप्रमाणे मुंबई कधीही झोपत नाही. केवळ काही तास धीम्या गतीने चालते. कारण त्यावेळी ट्रेन बंद असते परंतु टॅक्सी ओला उबर मात्र सुरू राहतात. दूध भाज्या फुल मार्केट यामुळे हे व्यवसाय करणारे लोक पहाटे दोनपासूनच कामाला सुरुवात करतात. त्यामुळे खरंतर मुंबई झोपतच नाही, असं म्हणावं लागेल. फार वेगळा काही ताण या प्रस्तावामुळे येणार नाही असं त्यांचं म्हणणं आहे. शिवाय बेस्ट बसची सेवा रात्री सुरू ठेवणार का याबाबत प्रस्ताव आला तर विचार करू अशी सावध भूमिका घेतली आहे. मुंबईत रहिवाशी आणि औद्योगिक अशा दोन स्तरावर विभाजन करणार खरंतर कठीण आहे. परंतु कुलाबा बीकेसी यासारखे काही भाग मात्र हे पूर्णपणे औद्योगिक आहेत. जिथे रात्रीच्यावेळी हा प्रयोग करून बघितला जाणार आहे. पुढे टप्प्याटप्प्याने जशी मागणी होईल, तशा सुविधा उपलब्ध करून देऊ, असे संकेत महापौरांनी दिले आहेत.

संबंधित पोस्ट