नुकतंच हिंदी सिनेमात केलं होतं काम, सेक्स रॅकेटमध्ये सापडली 18 वर्षीय मॉडेल!
बॉलिवूडमध्ये करिअर करण्यासाठी आलेल्या नवोदित अभिनेत्रींकडून नवीनकुमार वेश्याव्यवसाय करवून घेतो याची खातरजमा होताच पोलिसांनी सापळा रचला
- by Reporter
- Jan 16, 2020
- 1169 views
मुंबई(प्रतिनिधी): मुंबईत मागील आठवड्यात सेक्स रॅकेटमध्ये बॉलिवूड अभिनेत्रींना अटक करण्यात आल्याची घटना ताजी असताना आता आणखी एक प्रकरण समोर आलं आहे. ओशिवारा परिसरात वेश्या व्यवसायासाठी मॉडेल पुरविणाऱ्या बॉलिवूडमधील कास्टिंग डायरेक्टरला मुंबई पोलिसांच्या समाजसेवा शाखेनं अटक केली आहे.
नवीनकुमार प्रेमलाल आर्या (३२) असं या कास्टिंग डायरेक्टरचं नाव आहे. याप्रकरणी समाजसेवा शाखेनं एका 18 वर्षीय मॉडेलची आणि २५ वर्षीय मेकअप आर्टिस्टची सुटका केली आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या हिंदी चित्रपटात या मॉडेलने ज्युनिअर आर्टिस्ट म्हणून काम केलं आहे.
नवीनकुमार हा ओशिवारा परिसरात सेक्स रॅकेट चालवतो, अशी माहिती समाजसेवा शाखेचे प्रभारी पोलीस निरीक्षक संदेश रेवले यांना खबऱ्याकडून मिळाली होती. त्यानुसार, पोलिसांचे पथक नवीनकुमार याच्या मागावर होते.
बॉलिवूडमध्ये करिअर करण्यासाठी आलेल्या नवोदित अभिनेत्रींकडून नवीनकुमार वेश्याव्यवसाय करवून घेतो याची खातरजमा होताच पोलिसांनी सापळा रचला.
बनावट ग्राहकाच्या माध्यमातून पोलिसांनी नवीनकुमारकडे मॉडेलची मागणी केली. त्यानुसार, ओशिवारा येथील कॅफे सीसीडी इथं त्याने या ग्राहकाला बोलावलं. यावेळी एक मॉडेल आणि एक मेकअप आर्टिस्ट यांना त्याने सोबत आणलं होतं. त्याला मुलींच्या बदल्यात ६० हजार रुपये स्विकारताना पोलिसांनी रंगेहाथ पकडलं. याप्रकरणी त्याच्यावर अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्याने गुन्हा दाखल केला आहे.
सेक्स रॅकेटमध्ये बॉलिवूड अभिनेत्रींना अटक
दरम्यान, 10 जानेवारी रोजी मुंबईतील गोरेगाव परिसरातील सेक्स रॅकेटचा (mumbai sex racket) पोलिसांनी पर्दाफाश केला होता. यावेळी पोलिसांनी रॅकेटमध्ये सामील असलेल्या दोन बॉलिवूड अभिनेत्रींना अटक केली.
समतानगर येथील सीनिअर इन्स्पेक्टर राजूबाबू कसबे यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी मध्यरात्री गोरेगाव पूर्वेतील एका फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये छापा मारला. खबऱ्याद्वारे पोलिसांना या सेक्स रॅकेटबद्दल माहिती मिळाली होती. त्यानंतर पोलिसांमधील एका कर्मचाऱ्याने ग्राहक बनून सेक्स रॅकेटमध्ये सामील असलेल्या तरुणीशी संपर्क केला.
त्यानंतर सेक्स रॅकेटसाठी पैसे स्वीकारतानाच पोलिसांनी तरुणीला अटक केली. नंतर ही तरुणी बॉलिवूड अभिनेत्री असल्याचं समोर आलं आहे. याबाबत पोलिसांनी माहिती दिली आहे. 'सेक्स रॅकेटप्रकरणी 32 वर्षीय आणि 26 वर्षीय तरुणींना अटक करण्यात आली आहे. तसंच त्यांच्यावर याबाबत गुन्हादेखील नोंदवण्यात आला आहे,' अशी माहिती पोलीस अधिकारी धर्नेंद्र कांबळे यांनी दिली. अटक करण्यात आलेल्या तरुणींपैकी एक जण बिग बॉसमध्ये सहभागी झालेल्या एका स्पर्धकाची गर्लफ्रेंड असल्याचीही माहिती आहे. या प्रकरणात पोलीस आता अधिकचा तपास करत आहेत.
रिपोर्टर