उद्धव ठाकरेंचे विश्वासू मंत्रीच नाराज, महाविकास आघाडीत धोक्याची घंटा
नगरविकास खात्याचं विभाजन करून ती खाती स्वत: मुख्यमंत्री घेतील किंवा आदित्य ठाकरे यांच्याकडे सोपवली जातील अशीही चर्चा आहे.
- by Reporter
- Jan 14, 2020
- 629 views
मुंबई(प्रतिनिधी): महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारमध्ये सुरू असलेले नाराजी नाट्य संपण्याची चिन्हे नाहीत. उद्धव ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू आणि क्रमांक दोनचे मंत्री एकनाथ शिंदे हे नाराज असल्याची चर्चा आहे. एकनाथ शिंदे यांच्याकडील नगरविकास खात्याचं विभाजन होऊन नगरविकास - 3 असं नवं खातं निर्माण केली जाणार असल्याची चर्चा आहे. यात मेट्रो, नवी मुंबई विमानतळ, सिडको अशा अनेक महत्वाच्या प्रकल्पांची जबाबदारी असेल असंही सांगितलं जातेय. सध्या नगरविकास विभागाकडे ही सर्व खाती आहेत. ती खातीच गेली तर मग नगरविकास खात्याला काहीच अर्थ राहणार नाही असं बोललं जातं
नगरविकास खात्याचं विभाजन करून ती खाती स्वत: मुख्यमंत्री घेतील किंवा आदित्य ठाकरे यांच्याकडे सोपवली जातील अशीही चर्चा आहे. या हालचालींमुळे शिंदे नाराज असल्याची जोरदार चर्चा आहे.शिवसेनेत ठाकरे परिवारानंतर एकनाथ शिंदे सगळ्याच ताकदवान नेते समजले जातात. सत्तास्थापनेच्या नाट्यात शिवसेनेच्या आमदारांना एकत्रित ठेवण्यात शिंदे यांचा मोठा सहभाग होता. या संभाव्य बदलामुळे शिंदे गटात अस्वस्थता असल्याची चर्चा आहे.
'आज के शिवाजी, नरेंद्र मोदी'; वादग्रस्त पुस्तक मागे घेण्याची भाजपची घोषणा
सगळ्यात आधी मंत्रिमंडळ विस्तार, नंतर खातेवाटप, बंगल्यांचं वाटप, दालनांचं वाटप अशा अनेक कारणांवरून सरकारमधल्या नेत्यांची भांडणं चव्हाट्यावर आली होती. खातेवाटप काही दिवस रखडलं होतं. काँग्रेसकडे कमी महत्त्वाची खाती असल्याचं त्यांच्या नेत्यांना वाटप होतं. त्यामुळे वाद चव्हाट्यावर आले होते. त्यातच काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार हे खातेवाटप होऊन पाच दिवसापर्यंत नाराज होते. त्यानंतर त्यांनी पदभार स्वीकारला होता.
शरद पवारांना जाणता राजा म्हटलेलं चालतं का? भाजपचा विरोधकांना सवाल
'तर उद्धव ठाकरे राजीनामा देतील'
महाविकास आघाडीचं सरकार येऊन आता काही महिने होताहेत मात्र अजून त्यांच्यातली भांडणं पूर्णपणे मिटलेली नाहीत. वेगवेगळ्या कारणांवरून कुरबुरी सुरूच असल्याचं बाहेर येतंय. यावरूनच ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांनी काँग्रेस राष्ट्रवादीला चांगलंच सुनावलंय. आत काँग्रेस आणि राष्ट्रवादीने भांडणं थांबवावीत. तुम्हाला सत्ता ही भांडण्यासाठी दिलेली नाही असं त्यांनी सुनावलं. बंगले, ऑफिस, मंत्रिपदं यावरून सध्या सरकारमध्ये भांडणं असल्याचं पुढे आलं होतं. त्यावरून त्यांनी एका कार्यक्रमात हा सल्ला देत एक गंभीर इशाराही दिलाय.
'किती भाटगिरी करायची याला काही मर्यादा असतात', छगन भुजबळ भडकले
गडाख म्हणाले, काँग्रेस राष्ट्रवादीच्या भांडणामुळे सरकारची प्रतिमा मलीन होतेय. खरं तर काँग्रेस-राष्ट्रवादीने शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांचे आभार मानायला पाहिजे. त्यांनी सरकार तयार करण्याचा निर्णय घेतला नसता तर यांना फक्त तोंडाची हवा काढत बसावं लागलं असतं असंही ते म्हणाले.
गडाख पुढे म्हणाले, उद्धव ठाकरे हे काही राजकारणी नाहीत. मी त्यांना लहान असल्यापासून ओळखतो. ते कलाकार आहेत. ही भांडणं अशीच राहिलीत तर ते कधीही राजीनामा देऊ शकतात अशी शक्यताही त्यांनी बोलून दाखवली. त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीने वेळीच सावध व्हावे असा सल्लाही त्यांनी दिला.
रिपोर्टर